News
Typography

स्टार प्रवाहच्या 'शतदा प्रेम करावे' या मालिकेत एक वेगळं वळण आलं आहे. सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रुपानं एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचं होणारं लग्न उन्मेष थांबवू शकेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सायलीला मिळवण्यासाठी रोहन कोणत्याही थराला जायला तयार आहे. म्हणूनच आपल्याबरोबर लग्न न केल्यास उन्मेषला उध्वस्त करण्याची धमकी रोहन सायलीला देतो. सायली घाबरून रोहनबरोबर लग्न करण्यास राजी होते. मात्र, सायली आपल्याला का सोडून गेली, याचं कारण उन्मेषला कळत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उन्मेषला खरं कारण कळेल का आणि सायली-रोहनचं लग्न तो थांबवू शकेल का, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळणार आहे.

'शतदा प्रेम करावे' या मालिकेतलं हे नाट्य आता टिपेला पोहोचलं आहे. त्यामुळे न चुकता पहा 'शतदा प्रेम करावे'चा महाएपिसोड रविवारी, १७ जूनला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार
प्रवाहवर!

Shatada Prem Karave Sayali Rohan Unmesh Marriage 01

Shatada Prem Karave Sayali Rohan Unmesh Marriage 02

Shatada Prem Karave Sayali Rohan Unmesh Marriage 03

Shatada Prem Karave Sayali Rohan Unmesh Marriage 04

Shatada Prem Karave Sayali Rohan Unmesh Marriage 05

Shatada Prem Karave Sayali Rohan Unmesh Marriage 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement