News
Typography

झी युवा या वाहिनीने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली आणि प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिलं. या मालिकेत अभिनेता पुष्कर सरद पराग नावाच्या एका प्राध्यापकाची भूमिका सादर करत असून अभिनेत्री अश्विनी कासार ही पूर्वा नावाच्या शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे.

नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की पूर्वा आणि परागचं लग्न मोडलं कारण पूर्वाला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. जेव्हा पूर्वाचा गोंधळ उडतो आणि तिला मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा ती तिला पीएचडी साठी मार्गदर्शन करत असलेल्या पाठारे सरांकडून मार्गदर्शन घेते. या मालिकेत पठारे सरांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता मंगेश देसाई साकारत आहे. मंगेश देसाई यांनी बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यांची भूमिका देखील तितकीच सशक्त आहे. पूर्वा बोराडेचे हे पीएचडीचे सर, धनंजय पाठारे म्हणजे नगर मधील एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व शिस्तप्रिय, वेळेला महत्व देणारे आणि शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या पाठारे सरांचे मार्गदर्शन म्हणजे पूर्वासाठी सुवर्णसंधीच. पूर्वाला पीएचडीसोबतच आयुष्यात समोर येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जायचे याचं देखील मार्गदर्शन करत असतात. पाठारे सरांचं मार्गदर्शन म्हणजे हाताला धरून शिकवणं नव्हे तर आयुष्यात आलेल्या अनुभवांतून समोरच्याला शहाणं करणं. पूर्वाच्या आयुष्यात अचानक आलेला लग्नाचा विषय, तिची द्विधा मनस्थिती आणि लग्न व पीएचडी यामध्ये तिची उडालेली तारांबळ या सगळ्यात तिला कठोर शब्दात पण योग्य ते मार्गदर्शन करणारे प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे पाठारे सर.

Mangesh Desai Pathare Sir Katti Batti 02

Mangesh Desai Pathare Sir Katti Batti 03

English News

Katti Batti, the Zee Yuva's latest offering has received immense love and support from the viewers. Based on a twisted love story, the show rotates around the need of a small town girl to maintain a balance between studies and her marriage. In the story, Pushkar Sarad plays the role of Parag who hails from a middle-class service oriented family and Ashwini Kasar portrays the role of Purva who belongs to a family who run their own business. In the previous track, Purva and Parag finally called off their wedding but behind every action of Purva is someone nobody knows of, It is her Ph.D sir. The role of Pathare Sir is played by renowned actor 'Mangesh Desai'

Often in life we have someone who guides us through all our decisions and paths. For Purva it is her Ph.d sir, Dhananjay Pathare. He not only guides her in decisions to be taken on her education but also on personal life decisions. He is shown to be a very calm and composed person in the show. Just like every other professor, he too is very discipline when it comes to studies or his life. Pathare sir believes in puntuality and also preaches the same. He is a portrayed as Pruva's guiding light in the show as she always consults with him before making a decision. He often believes in the principle of 'You must learn from other's mistakes' and also guides Purva with his good and bad life experiences. At the end of it all, Pathare sir always tells her that she has to choose her own way to walk on and stay loyal with her decisions.

To witness the role Pathare sir plays in Purva's life, keep watching "Katti Batti’ at 7.30 PM from Monday to Saturday only on Zee Yuva!

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement