News
Typography

झी युवा लवकरच त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'आम्ही दोघी' ही नवीन मालिका सादर करणार आहे. आम्ही दोघी ही मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या दोन बहिणी आणि त्यांच्या घट्ट नात्याभोवती फिरते.

मीरा आणि मधुराचे पात्र अभिनेत्री खुशबू तावडे आणि शिवानी रंगोळे साकारत आहेत. तसेच त्यांच्या सोबत विवेक सांगळे देखील प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त मालिकेत प्रेक्षकांना सतीश पुळेकर, वर्षा दांदळे, विजय निकम यांसारखे हरहुन्नरी कलाकार पाहायला मिळणार आहेत.

Watch Promo

मालिकेतील दोन्ही बहिणी म्हणजे एकमेकांच्या गळ्यातील ताईत. एक अल्लड आणि मस्तीखोर तर दुसरी तितकीच शांत व समजूतदार. आई-बाबांविना मामाच्या छत्रछायेखाली वाढलेल्या मीरा आणि मधुरा एकमेकींच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतात. दृष्ट लागण्याजोगी ही बहिणींची जोडी कायम अशीच राहील का?

दोन बहिणींचे नाते उलगडणारी कथा प्रेक्षक 'आम्ही दोघी' या मालिकेद्वारे २५ जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता झी युवावर पाहू शकणार आहेत.

Aamhi Doghi Zee Yuva Serial Khushboo Shivani 01

Aamhi Doghi Zee Yuva Serial Khushboo Shivani 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement