News
Typography

राधाच्या आयुष्यात सध्या बऱ्याच घटना घडत आहेत तिच्यासमोर बऱ्याच गोष्टींचा उलघडा होत आहे, तिच्यासमोर अनेक सत्य येत आहे. राधा सध्या प्रेमा म्हणून इंदौर येथील एका इस्पितळात परिचारिकेचे काम करत असतानाच इस्पितळाचे मालक आनंद नाडकर्णी यांच्या विनंतीला स्वीकारत राधा त्यांच्या वडिलांची देखरेख आणि सेवा करण्यासाठी त्यांच्या घरी रहाण्यास तयार झाली होती. यामध्येच राधाला प्रेमच्या आईचे म्हणजेच माधुरीबद्दलचे खूप मोठे सत्य समोर आले आणि ते म्हणजे प्रेमची आई माधुरी ही आनंद नाडकर्णी यांच्या वडिलांची बायको होती. हे सगळे होत असतानाच प्रेम आणि राधाची भेट होता होता राहून गेली. परंतु राधा समोर प्रेम आणि दीपिकाच्या नात्याचे सत्य समोर आले. राधाला हे कळाले आहे कि, आता प्रेमने तिला विसरून दीपिकाचा स्वीकार केला आहे. परंतु आनंद नाडकर्णी यांना प्रेमा म्हणजेच राधाचा नवरा प्रेम कोण आहे हे कळाले आहे. यामुळे राधाला आश्चर्य वाटले आहे. दुसरीकडे राधा माधुरीबद्दल सत्य कळल्याने तिने आनंद नाडकर्णी यांना त्यांच्या घरामध्ये ती आता राहू शकत नाही असे सांगितले आहे. आता राधा ते घर सोडणार कि तिथेच राहणार ? आनंद नाडकर्णी यांना राधाचे संपूर्ण सत्य कळणार का ? राधा आणि प्रेम यांची भेट कशी, कधी आणि कुठे होणार ? हे बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली मालिककेमध्ये सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठी वर.

प्रेम देवयानी आणि दीपिकाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकून गेला आहे. त्याला सत्य काय आहे हे देखील जाणून घ्यायचे नाहीये. त्याने दीपिकाला आता स्वत:च्या घरामध्ये रहाण्यासाठी आणले आहे. माधुरीला ही गोष्ट पटलेली नाही. घरामध्ये येताच ज्याप्रकारे ती माधुरीशी बोलली ते माधुरीला पटले नाही. दीपिकाच्या बोलण्याने माधुरी बरीच दुखावली गेली. दीपिकाने तिला राधा मेली असून आता तू देखील लवकरच मरणार आणि तुझा नवराच तुला मारणार असे बोलल्यावर माधुरीने दीपिका एक थोबाडीत मारली कारण हे सगळे ऐकून घेणे तिच्यासाठी असह्य झाले. आता प्रेम यावर काय बोलणार ? तो माधुरीला काय सांगणार ? हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.

राधा आणि प्रेमची आता लवकरच भेट होणार असून ती कधी होणार ? राधा आणि प्रेमची भेट मध्ये आनंद नाडकर्णी घडवून आणणार ? प्रेम राधाला काय बोलणार ? प्रेम समोर आल्यावर राधा प्रेमला दीपिकाचे सत्य सांगणार ? प्रेम राधावर विश्वास ठेवणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली मालिककेमध्ये सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठी वर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement