News
Typography

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.

चला हवा येऊ द्याच्या आगामी भागात थुकरट वाडीत मिच् थुकरटवाडी २०१८ सौंदर्य स्पर्धा रंगणार आहे आणि या मिच् थुकरटवाडीमध्ये सहभागी होणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, प्रार्थना बेहेरे आणि रिंकू राजगुरू. निलेश आणि भाऊ कदम यांनी या सर्व अभिनेत्रींना जाऊन मिच् थुकरट वाडीचा किताब दिला आहे खरा, पण यातली नक्की मिच् थुकरट कोण असणार? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या सोमवार २५ जून आणि मंगळवार २६ जून रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!!!

Watch Video Promo

More Photos

Miss Thukratwadi 2018 Chala Hawa Yeu Dya 02

Miss Thukratwadi 2018 Chala Hawa Yeu Dya 03

Miss Thukratwadi 2018 Chala Hawa Yeu Dya 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement