News
Typography

झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाचे २ रे पर्व घेऊन सज्ज झाले आहे. हे नवे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले. संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. या नव्या पर्वात स्पर्धक हे नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे हरहुन्नरी गायक असणार आहे.

मागील आठवड्यात ऑडिशन्स नंतर आगामी भागात प्रेक्षक या स्पर्धेतील परीक्षक म्हणजेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि लोकप्रिय लोकसंगीत गायक आदर्श शिंदे यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. राहुल देशपांडे यांच्या गाण्यानंतर आदर्श शिंदे तालचक्र बँड सोबत राहुल देशपांडे यांच्या सोबत जुगलबंदी करायला सज्ज होणार आहे. राहुल आणि आदर्श यांना एकत्र गाताना पाहणं ही रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल. त्याचसोबत संगीत सम्राट पर्व २ मधील सर्वात लहान स्पर्धक आराध्या जी फक्त ५ वर्षांची आहे ती 'एकटी एकटी' हे गाणं गाऊन परीक्षक आणि कॅप्टन्सची मनं जिंकणार आहे. हरगुन कौर ही स्पर्धक देखील तिच्या उत्कृष्ट परफॉर्मन्सने परीक्षकांनी दाद मिळवणार आहे. या आठवड्यात एकूण ४७ स्पर्धकांची निवड केली जाणार असून त्यानंतर त्यांना टीममध्ये निवडले जाणार आहे. इतके उत्कृष्ट टॅलेंट पाहता, टीम सिलेक्शन प्रोसेस देखील तितकीच कठीण होणार आहे यात शंकाच नाही.

तेव्हा तुमचे दिवस सुरमयी बनवण्यासाठी पाहायला विसरू नका 'संगीत सम्राट पर्व २' बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर!!

Musical Dual Rahul Deshpande Adarsh Shinde Sangeet Smrat 2 01

Musical Dual Rahul Deshpande Adarsh Shinde Sangeet Smrat 2 02

Musical Dual Rahul Deshpande Adarsh Shinde Sangeet Smrat 2 03

Musical Dual Rahul Deshpande Adarsh Shinde Sangeet Smrat 2 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement