News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये दर आठवड्याप्रमाणे आज देखील रंगणार WEEKEND चा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत. कालच्या भागामध्ये महेश मांजरेकरांनी सगळ्या सदस्यांना जाब विचारले. मग ते नंदकिशोर यांचे हुकुमशहा असतानाचे वागणे असो वा त्यांनी पुष्कर, मेघा आणि सईच्या वैयक्तिक गोष्टींवर केलेली चर्चा असो. आस्तादच्या चुकीच्या वागण्यावर तसेच त्याच्या ग्रुपलाच फक्त तो पाठीशी का घालतो ? त्यांच्या चुका त्याला दिसत नाही का ? मेघाने लपवलेले झेंडे दिसले रेशमने लपवलेले झेंडे नाही दिसले का ? असे प्रश्न विचारले, ज्यावर आस्तादचे म्हणणे होते हे त्याला माहितीच नव्हते.

नंदकिशोर यांच्या बोलण्यावर आस्ताद आणि रेशमचे हसणे आणि त्यांच्या म्हणण्याला दुजोरा असल्याचेच जणू त्यातून व्यक्त होणे हे देखील महेश मांजरेकर यांना खटकले आणि त्यांनी रेशमला विचारले कि, का नाही नंदकिशोरला थांबवले ? इतर वेळी मेघा, सई यांना टास्क मध्ये हे केलेले चुकीचे आहे हे करू नका, ते करू नका, मेघाला बोलू नको असे सांगणारा आस्ताद या आठवड्यातील कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान रेशमला सांगण्यास का मागे पडला कि, असे शूज मधून पाय काढण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे ? महेश मांजरेकर यांनी सईला देखील सांगितले पुष्कर बाबत अथवा कोणाबाबतही बोलण्याचा हक्क आहे त्यामुळे मेघा, शर्मिष्ठा, आऊ वर असे चिडणे, आपल्या मनासारखे न झाल्यास रुसणे हे बरोबर नाही. थोडक्यात काल सगळ्याच सदस्यांची महेश मांजरेकर यांनी शाळा घेतली. आज WEEKEND चा डाव मध्ये काय घडणार ? कोणत्या चाहत्याचा कोणासाठी फोन येणार ? तो काय प्रश्न विचारणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका आजचा WEEKEND चा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

आज WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर सगळ्या सदस्यांसोबत “कानगोष्टी” नावाचा एक छोटासा गेम खेळणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांबाबत त्याला काय वाटते हे मोठ्याने त्या कानामध्ये सांगायचे आहे. सईने आस्ताद, नंदकिशोर बद्दल नाराजी व्यक्त करणार आहे तर आऊला एक छान निरोप देणार आहे. इतर सदस्य कोणाबद्दल काय बोलतील ?

हे बघायला विसरू नका आजच्या बिग बॉस मराठीच्या WEEKEND चा डाव - महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 70 Bigg Boss Marathi 02

Day 70 Bigg Boss Marathi 03

Day 70 Bigg Boss Marathi 04

Day 70 Bigg Boss Marathi 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement