News
Typography

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा कार्यक्रमामधील गायकांनी गायलेली विविध शैलींमधील गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. एक आश्चर्याचा सुखद धक्का या गायकांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच प्रेक्षकांना दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर आता कलर्स मराठी घेऊन येत आहे “सूर नवा ध्यास नवा Little Champs”. या पर्वामध्ये देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे परंतु मंचावर असणार आहेत लहान मुले. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास सुरु होणार आहे ६ जुलै पासून. या पर्वाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात आहे.

अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.colorsmarathi.com किंवा भेट द्या कलर्स मराठीच्या अधिकृत फेसबुक पेजला.

कार्यक्रमाच्या ऑडिशन्सचे वेळापत्रक खाली दिल्याप्रमाणे आहे :

६ जुलै – रत्नागिरी*
पत्ता - गोगटे जोगळेकर कॉलेज, अॅडवोकेट एन. वी. जोशी मार्ग, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोर्टजवळ, रत्नागिरी – ४१५६१२

७ जुलै - कोल्हापूर*
पत्ता - देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर - ४१६०१२

८ जुलै - पुणे*
पत्ता - डी. इ. एस. सेकंडरी स्कूल, ४८६ सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल कॅम्पस, टिळक रोड, पुणे - ३०

११ जुलै - नागपुर*
पत्ता - सुयोग मंगल कार्यालय, ५१, लक्ष्मी नगर, नागपुर - ४४००१०

१४ जुलै - मुंबई*
पत्ता - आय. इ. एस. मॉडर्न हायस्कूल (अॅशलेन), डी एस बाब्रेकर मार्ग, साने गुरुजी शाळेमागे, दादर (प), मुंबई - ४०००२८

१५ जुलै - ठाणे*
पत्ता - ब्राम्हण महाविद्यालय, घंटाळी देवी मंदिर रोड, तीन पेट्रोल पंपजवळ, नौपाडा, ठाणे (प) - ४००६०२

१७ जुलै - औरंगाबाद*
पत्ता - शिवछत्रपती महाविद्यालय , सिडको, एन - ३, औरंगाबाद - ४३१००३

१८ जुलै - नाशिक*
पत्ता - रुद्र इंटरनॅशनल स्कूल , अंबड त्रिमूर्ती लिंक रोड, उपेन्द्र नगर, नाशिक - १०

Sur Nava Dhyas Nava Little Champs Colors Marathi Title 01

 

4 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement