News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशन कार्य. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात आली. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारे हे कार्य होते. सई बिग बॉस मराठीच्या घराची कॅप्टन असल्याने ती सुरक्षित होती. काल नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये रेशम, आस्ताद आणि स्मिता नॉमिनेट झाले तर मेघा, शर्मिष्ठा, पुष्कर हे या आठवड्यामध्ये सुरक्षित आहेत. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार ? कोण सुरक्षित होणार ? हे बघणे रंजक असणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहेत कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच वीणा जगताप. तसेच लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे कलाकार. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भवो असे म्हंटले जाते. पाहुणचार हे आपले वैशिष्ट्य आहे. आज बिग बॉसच्या घरामध्ये आलेले पाहुण्यांचे योग्य ते आदरातिथ्य व्हावे यासाठी बिग बॉसचे BB हॉटेल मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. सर्व सदस्यांनी मिळून हे कार्य करायचे असे बिग बॉस सांगणार असून सई घराची कॅप्टन असल्याने या हॉटेलची ती Manager असणार आहे. BB Hotel मध्ये अतिथी म्हणून राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच विणा जगताप येणार आहेत. आणि घरातील सदस्यांना त्यांची सेवा करायची आहे. त्यानंतर लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेतील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे देखील येणार आहेत. यांचे मनोरंजन करण्यासाठी पुष्करने एक छान लावणी देखील सादर केली आहे. हे सगळे मिळून BBHotel मध्ये आलेल्या अतिथींची कशी काळजी घेणार ? कोणते कोणते टास्क त्यांना मिळणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

तेंव्हा बघायला विसरू नका तुमच्या लाडक्या कलाकरांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 86 Bigg Boss Marathi 01

Day 86 Bigg Boss Marathi 02

Day 86 Bigg Boss Marathi 03

Day 86 Bigg Boss Marathi 05

Day 86 Bigg Boss Marathi 06

Day 86 Bigg Boss Marathi 07

Day 86 Bigg Boss Marathi 08

Day 86 Bigg Boss Marathi 09

Day 86 Bigg Boss Marathi 10

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement