News
Typography

कलर्स मराठी वरील सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात आहे. या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स नुकत्याच गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथे पार पडल्या. कार्यक्रमाच्या या ऑडीशन्सला रत्नागिरीमधील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या रत्नागिरी केंद्रावर पार पडलेल्या निवड चाचणीतून मुंबईतील मेगा ऑडीशन्ससाठी पाच स्पर्धक निवडण्यात आले. आदित्य पंडित, हर्षाली कालेकर, श्रेया भागवत, सृष्टी तांबे आणि कुणाल साळवी.

या ऑडीशन्समध्ये जवळपास २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सूर नवा ध्यास नवाचे मागील पर्व हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले त्या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. हे पर्व छोटे सुरवीर गाजवणार हे नक्की. या बालगोपाळांचे सुरेल गाणं ऐकायला संपूर्ण महराष्ट्र आतूर आहे.

अधिक माहितीसाठी लॉग इन करा http://www.colorsmarathi.com/shows/Sur_Nava_Dhyas_Nava_Little_Champs/ किंवा भेट द्या कलर्स मराठीच्या अधिकृत फेसबुक पेजला.

आदित्य पंडित

SNDN Ratnagiri Center Aditya Pandit

हर्षाली कालेकर

SNDN Ratnagiri Center Harshali Kalekar

कुणाल साळवी

SNDN Ratnagiri Center Kunal Salvi

श्रेया भागवत

SNDN Ratnagiri Center Shreya Bhagwat

सृष्टी तांबे

SNDN Ratnagiri Center Srushti Tambe

SNDN Ratnagiri Center 01

SNDN Ratnagiri Center 02

 

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement