News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस सदस्यांना रोज वेगवेगळ्या प्रकारचे कार्य देत असतात. काल देखील बिग बॉस यांनी सदस्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे हटके कार्य सोपावले आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना “टिकीट टू फिनाले” मिळणार असे घोषित केले. आता या रेस मध्ये कोणाला “टिकीट टू फिनाले” मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. याचाच अर्थ ज्याला हे टिकीट मिळणार तो थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहचणार आहे.

तसेच याच टास्कमध्ये अजून एक कार्य देण्यात आले. ते म्हणजे सदस्यांना एकमेकांचे प्रतिनिधित्व करायचे होते. सदस्यांना बाबागाडी देण्यात आली आणि ज्या सदस्याची बाबागाडी पार्क होऊ शकणार नाही तो “टिकीट टू फिनाले” या रेस मधून आउट होणार. काल आस्तादची बाबागाडी पुष्कर पार्क करण्यात असफल ठरला त्यामुळे आस्ताद या रेसमधून बाद झाला. तसेच बिग बॉस यांनी सदस्यांना अजून एक टास्क दिला ज्यामध्ये सदस्यांना ज्यांना नॉमिनेट करायचे आहे त्यांच्या चेहऱ्यावर फोम लावायचे आहे असे सांगितले. ज्यामध्ये सई, मेघा, शर्मिष्ठा आणि पुष्करने रेशमला नॉमिनेट करून “टिकीट टू फिनाले” या रेस मधून बाद केले. अश्याप्रकारे आस्ताद आणि रेशम या टास्कमधून काल बाद झाले. आज टास्कमध्ये काय होणार ? कोणता टास्क बिग बॉस देणार ? हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

बिग बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहेत. ज्यामध्ये स्मिताला रेशम आणि आस्ताद मधील संभाषण दाखविण्यात येणार आहे. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे. हे बघितल्यानंतर सदस्यांमध्ये वाद होणार हे नक्की. रेशम मेघाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कि, ती जे काही पर्सनल तिच्याबद्दल बोलली ते बोलायला नको होतं. तसेच सई शर्मिष्ठाला आणि आस्ताद मेघाला जाब विचारणार आहे. यानंतर घरामध्ये नाती बदलतील ? मेघा, सई आणि पुष्करच्या मैत्री मध्ये पुन्हा फुट पडेल ? हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळलेच.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना येऊन आता जवळ जवळ ९० दिवस पूर्ण होतील. या प्रवासामध्ये स्पर्धकांमध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका, अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज – गैरसमज याची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून काढत स्वत:वर विजय मिळविण्यासाठी बिग बॉस आज सदस्यांवर आज बॉक्स – अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये नक्की काय होणार आहे ? हे बघणे रंजक असणार आहे.

तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 88 Bigg Boss Marathi 02

Day 88 Bigg Boss Marathi 03

Day 88 Bigg Boss Marathi 04

Day 88 Bigg Boss Marathi 05

Day 88 Bigg Boss Marathi 06

Day 88 Bigg Boss Marathi 07

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement