स्टार प्रवाहवरच्या लेक माझी लाडकी या मालिकेत ऋषिकेशच्या कटकारस्थानांना तोंड देता देता मीरा हतबल झाली आहे. ऋषिकेशकडे दिलेलं सानिकाचं बाळ मीरा परत आणू शकेल का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ऋषिकेशच्या डावपेचांना बळी पडल्यामुळे मीरा सानिकाचं बाळ ऋषिकेशच्या हाती सोपवते. मात्र, त्या बाळाचं अपहरण होतं. या प्रकारानंतर संपूर्ण कुटुंबाकडून मीराला प्रश्न विचारले जातात. मात्र, मीराकडे काहीच उत्तर नसतं. ऋषिकेशकडे दिलेलं बाळ परत आणणं एवढंच तिच्या हाती राहिलेलं आहे.
आता ऋषिकेशकडचं बाळ मीरा परत आणू शकेल का, त्यासाठी तिला काय करावं लागेल अशा प्रश्नांची उत्तरं पुढील भागांतून मिळतील. त्यासाठी न चुकता पहा लेक माझी लाडकी सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!