News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले बिग बॉस यांचा वाढदिवस साजरा करण्याचे हटके कार्य आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना “टिकीट टू फिनाले” मिळणार असे घोषित केले. आता या रेस मध्ये कोणाला “टिकीट टू फिनाले” मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. याचाच अर्थ ज्याला हे टिकीट मिळणार तो थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहचणार आहे. काल मेघा “टिकीट टू फिनाले” या रेस मधून बाद झाली. आज टास्कमध्ये काय होणार ? “टिकीट टू फिनाले” या रेसमधून कोण बाद होणार ? कोणाला “टिकीट टू फिनाले” मिळणार ? तसेच आज कोणते अतिथी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार ? हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांच्या प्रवासामध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका, अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज – गैरसमज याची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून काढत स्वत:वर विजय मिळविण्यासाठी बिग बॉस आज सदस्यांवर आज बॉक्स – अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये नक्की काय होणार आहे ? हे बघणे रंजक असणार आहे. ज्यामध्ये मेघा, आस्ताद आणि रेशम यांना मिळून बॉक्स मध्ये असलेले शर्मिष्ठा, पुष्कर, स्मिता आणि सई यांना त्या बॉक्स मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तसेच काल झालेल्या चर्चेवरून आणि वादावरून शर्मिष्ठा आणि मेघा मध्ये आज बरीच चर्चा होणार आहे ती काय आहे हे आज बघायला विसरू नका.

तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 89 Bigg Boss Marathi 02

Day 89 Bigg Boss Marathi 03

Day 89 Bigg Boss Marathi 04

Day 89 Bigg Boss Marathi 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement