News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून रेशम टिपणीस घराबाहेर पडली. बिग बॉस यांनी दिलेल्या विशेष अधिकारानुसार रेशमने आस्तादला या आठवड्यामधील नॉमिनेश मधून वाचविले. आणि त्यामुळे पुष्कर बरोबर आता आस्ताद देखील बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये पोहचला. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य शिक्षक यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. काय असणार आहे हा टास्क ? काल महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि कोणी एक सदस्य या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार आहे. कोण होईल नॉमिनेट ? कोण पडेल घराबाहेर ? हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठी मध्ये सोम ते शनि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार एक अनोखा टास्क. अंदाजे तीन महिने एकत्र राहिल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांकडून काहीना काही शिकले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांनी शाळे सारख्या अनेक गोष्टी शिकल्या. शाळा म्हंटल कि, वर्गामध्ये दबदबा असलेला monitor, पहिल्या बाकावर बसणारी हुशार मुलं, शेवटच्या बेंचवर बसणारी दंगा घालणारी मुलं, असे नानाविध प्रकारचे विद्यार्थी असतात. आज बिग बॉस घरातील सदस्यांना “मस्ती कि पाठशाला” हे कार्य सोपवणार आहेत. या टास्कमध्ये काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य शिक्षक बनणार आहेत. या टास्कमध्ये सदस्य बरीच धम्माल मस्ती करणार आहेत हे नक्की. सई आणि आस्ताद बनणार शिक्षक. तेंव्हा तुम्ही पण हा टास्क बघायला विसरू नका.

काल बिग बॉस मराठीच्या WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर यांनी प्रत्येक सदस्याला त्याला सोडून एका सदस्याला निवडायचे होते ज्या सदस्याला ती व्यक्ती त्याच्यासोबत अंतिम सोहळ्यामध्ये बघायची इच्छा आहे. शर्मिष्ठाने मेघा तर मेघाने शर्मिष्ठाला, आस्तादने स्मिताला, स्मिताने रेशमला, रेशमने शर्मिष्ठाचे नाव घेतले. तर सईने पुष्करचे तर पुष्करने मेघाला निवडले. ज्यावरून मेघावर सई आणि पुष्कर नाराज होणार आहेत. कारण मेघाने शर्मिष्ठाचे नाव घेतले. पण, यावर मेघाचे म्हणणे असणार आहे पुष्कर आणि सई माझं नाव कधीच घेत नाही आणि हि गोष्ट मेघाने शर्मिष्ठा जवळ शेअर केली जी तिला देखील पटली. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 92 Bigg Boss Marathi 01

Day 92 Bigg Boss Marathi 02

Day 92 Bigg Boss Marathi 03

Day 92 Bigg Boss Marathi 04

Day 92 Bigg Boss Marathi 05

Day 92 Bigg Boss Marathi 06

Day 92 Bigg Boss Marathi 07

Day 92 Bigg Boss Marathi 08

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement