News
Typography

प्रेक्षकांची क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा शंभूराजे आणि दिलेरखानाच्या भेटीचा प्रसंग अखेर प्रेक्षक प्रसंग येत्या रविवारी झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात पाहू शकणार आहेत. शंभूराज दिलेरखानाकडे श्री क्षेत्र माहुली इथून नदी ओलांडून गेले अशी इतिहासात नोंद आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या टीमनेही त्याच ठिकाणी या प्रसंगाचे चित्रीकरण अथक परिश्रम घेत झटून आणि जिद्दीने पूर्ण केले. हा सुवर्णयोगच म्हणावा लागेल. ३४० वर्षांपूर्वी जिथे भेट घडली होती म्हणजेच श्री क्षेत्र माहुली येथे जाऊन चित्रीकरण करण्यात आले आहे.

त्या अनुभवाबद्दल संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे म्हणतात, "संभाजी महाराज आणि दिलेरखान यांची भेट जिथे झाली तो माहुलीचा भाग आजही जसाच्या तसा ठेवण्यात आला आहे. माहुली संगमावर आम्ही हा प्रसंग चित्रित केला. धोधो पाऊस पडत होता, कृष्णावेण्णा नदीही जोरात वाहत होती. कधीही धरणाचे दरवाजे उघडले जातील अशी परिस्थिती होती अन त्यातच घोड्यावर बसून नदी पार करण्याचा प्रसंग साकारायचा होता. २ सेकंद विचार केला आणि बाकीच्या टीमची मेहनत पाहून घोड्याला टाच मारली. अशा वेळी तुमचा तुमच्यावर आणि तुमच्या घोड्यावर असलेला विश्वास महत्वाचा असतो. एके ठिकाणी नदी पात्रात अनपेक्षित खड्डा आला आणि त्यात घोडा अडकला मग त्याला बाहेर काढावं लागलं पण प्रसंग खूप अप्रतिम चित्रित झाला आहे. प्रेक्षक हा प्रसंग २२ जुलैला प्रसारित होणाऱ्या महाएपिसोड मध्ये पाहू शकतील."

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 01

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 03

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement