News
Typography

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे.

संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते. काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. शंभुराजे दिलेरखानाकडे श्री क्षेत्र माहुली येथून नदी ओलांडून गेले अशी इतिहासात नोंद आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' च्या टीमने याच ठिकाणी चित्रीकरण करत एक अनोखा योग साधला आहे.

हा योग साधताना 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या संपूर्ण टीमने अक्षरश: तारेवरची कसरत करत जिद्दीने हे चित्रीकरण पूर्ण केले. चित्रीकरणादरम्यान असलेला धुवाँधार पाऊस आणि कृष्णावेण्णेच्या पाण्याला आलेला पूर या सगळ्यावर मात करत संभाजीच्या टीमने चित्रित केलेल्या या रोमहर्षक भागाचा आस्वाद आपल्याला रविवारच्या भागात घेता येणार आहे. जिथे इतिहास घडला त्याभागात चित्रीकरण करण्याचा कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव अनुभवायचा असेल तर झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा रविवारी २२ जुलैला रात्रौ ९.०० वाजता प्रसारित होणारा विशेष भाग पहायला विसरू नका. जगदंब क्रिएशन’ची निर्मिती असलेल्या या मालिकेचे निर्माते डॅा. घनश्याम राव, विलास सावंत, अमोल कोल्हे असून दिग्दर्शन विवेक देशपांडे, कार्तिक केंढे यांचे आहे.

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 01

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 02

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 03

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 04

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 05

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 06

Amol Kolhe Swarajya Rakshak Sambhaji 07

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement