संपूर्ण महाराष्ट्र काय तर जग ज्या दिवसाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत होता तो क्षण आला. अवघ्या दोनच दिवसात प्रेक्षकांना कळणार बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा पहिला विजेता. GRAND FINALE म्हणजे धम्माकेदार होणार यात वादच नाही. ज्या कार्यक्रमाची सुरुवातच मुळी इतक्या जोश्यात झाली त्याची सांगता पण तशीच होणार हे तर नक्की. GRAND FINALE ची तयारी सुरु झाली असून बिग बॉस मराठीच्या घरामधून जे स्पर्धक बाहेर पडले ते देखील यामध्ये सहभागी असणार आहेत. अंतिम फेरीमध्ये ६ स्पर्धक पोहचले असून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. आज WEEKEND चा डाव मध्ये काय होणार ? कोणते सरप्राईझ मिळणार ? कोणते performance बघायला मिळणार ? हे बघायला विसरू नका आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
GRAND FINALE साठी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील ६ Finalists देखील perform करणार आहेत. ज्यामध्ये मेघा, शर्मिष्ठा, आस्ताद, स्मिता, पुष्कर, सई यांचे डान्स बघायला मिळणार आहेत. रेशम टिपणीस, जुई गडकरी, ऋतुजा, सुशांत शेलार, राजेश शृंगारपुरे यांची Rehearsal सुरु झाली आहे. रेशम टिपणीस खल्लास आणि नागीन नागीन या गाण्यावर तर जुई – ऋतुजा आली रे आणि धाकड या गाण्यावर डान्स करणार आहेत. तेजस पुजारीने नृत्यदिग्दर्शन केले आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० आणि उद्या संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.