News
Typography

फुलपाखरू या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि बघता बघता मालिकेने १ वर्षाचायशस्वी प्रवास पूर्ण केला. कॉलेजच्या दिवसातील मानस आणि वैदेहीचं निरागस प्रेम, त्यांच्या नात्यातील उतार चढाव आणि त्यांची एकमेकांना असलेली साथ हे सर्वच प्रेक्षकांना भावलं आणि आता त्यांचे आवडते मानस आणि वैदेहीआता लग्नबेडीत अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबांच्या संमत्तीने आता लग्नाची तयारी पुढे नेण्यात आली आहे तसेच लग्नाचा मुहूर्त लवकरच असल्यामुळे दोन्ही घरात लगीनघाई सुरु आहे. लग्नाचं घर म्हणजे सतराशे साठ कामे आणि सर्वच मोठी तयारी म्हणजे लग्नाची खरेदी. घरातील मंडळी आणि मित्रपरिवार सजावट आणि इतर समारंभाची तयारी करत असताना मानस आणि वैदेही लग्नाची खरेदी उरकण्याची लगबग करत आहेत.

खरेदी मधील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवरीचा शालू. आश्चर्याची बाब म्हणजे मुलींच्या गोतावळ्यामध्ये मानसदेखील या साड्यांच्या खरेदीमध्ये वैदेहीची मदत करणार आहे. ही साड्यांची खरेदी करण्यासाठी वैदेही ठाण्यातील कलामंदिर या दुकानात जाते. दुकानातील एकापेक्षा एक सुंदर साड्या बघून वैदेहीचा मात्र गोंधळ उडाला आहे. सगळ्यांच्या संमत्तीने वैदेही तिच्यासाठी एक छान नववारी घेते. तसेच मानसच्या कुटुंबातील देखील त्यांच्यासाठी छान पारंपरिक काठा पदराच्या साड्या घेतात. वैदेही देखील बऱ्याच साड्या ट्राय करून बघते. वैदेही आणि मानससाठी हा खरेदीचा दिवस म्हणजे एकमेकांची आवड अजून चांगल्याप्रकारे जाणून घयायची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. खूप साऱ्या साड्यांच्या खरेदीनंतर वैदेही दुकानदाराला साड्यांची घरी डिलिव्हरी करायला सांगते.

इतक्या उत्तम खरेदीनंतर प्रेक्षक वैदेहीला नवरीच्या रूपात पाहायला नक्कीच उत्सुक असतील यात शंकाच नाही!!

More Shopping Photos

Phulpakharu Wedding Shopping 01

Phulpakharu Wedding Shopping 02

Phulpakharu Wedding Shopping 03

Phulpakharu Wedding Shopping 04

Phulpakharu Wedding Shopping 05

Phulpakharu Wedding Shopping 06

Phulpakharu Wedding Shopping 07

Phulpakharu Wedding Shopping 08

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement