News
Typography

कॉलेजमधील निरागस प्रेम प्रेक्षकांसमोर आणणारी फुलपाखरू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि त्यातील प्रमुख भूमिकेतील मानस आणि वैदेही ही पात्र तर त्यांच्या मनात घर करून बसली आहेत. २९ जुलै या शुभ मुहूर्तावर ते दोघेही बोहल्यावर चढणार असून हा अभुतपूर्व विवाह सोहळा प्रेक्षक २ तासाच्या महाभागात अनुभवू शकणार आहेत. तसेच लग्नाची खरेदी, मेहंदी, व्याही भोजन, संगीत आणि हळद हे समारंभ देखील प्रेक्षक या आठवड्यात पाहू शकणार आहेत. मेहंदीच्या दिमाखदार सोहळ्यानंतर आता वैदेही आणि मानस यांच्या संगीत समारंभाची लगबग सुरु झाली आहे.

हा संगीत समारंभ देखील तितकाच दिमाखदार असणार आहे. वैदेही आणि मानस यांचे सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवार या समारंभात आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणार असून एका पेक्षा एक परफॉर्मन्सची मेजवानी अनुभवणार आहेत. इतकंच नव्हे तर मानस आणि वैदेही यांचा देखील एक स्पेशल परफॉर्मन्स या संगीत समारंभात सादर होणार आहे. मुलाच्या संगीतमध्ये मानसचे आई बाबा मंचावर थिरकणार आहेत. शीतल राजे आणि शाल्मली मॅडम एका रोमँटिक गाण्यावर परफॉर्म करणार आहेत.

मानस आणि वैदेही यांच्या मित्र मैत्रिणींची गॅंग या कार्यक्रमात कशी मागे राहील? संगीत समारंभात अमित आणि वर्षा तसेच समीर आणि तानिया यांचे रोमँटिक गाण्यावरील  रफॉर्मन्सेस सर्व पाहू शकणार आहेत. तसेच चेतन आणि गौरव हे सर्वांना त्यांच्या विनोदांनी हसवणारी आहेत. नवरदेवाच्या मित्रांचा गोतावळा खुद्द त्याच्यासोबत 'आवाज वाढव डीजे' या गाण्यावर धम्माल परफॉर्मन्स सादर करणार आहे तसेच त्यांच्या या परफॉर्मन्सला टक्कर देण्यासाठी वैदेहीच्या करवल्या देखील दमदार परफॉर्मन्स देणार आहेत.

सगळ्यांच्या परफॉर्मन्स नंतर जेव्हा नवरा आणि नवरी यांच्या परफॉर्मन्सची वेळ येते तेव्हा तिकडचे सर्व दिवे बंद होतात, याच कारण म्हणजे मानस आणि वैदेहीचा परफॉर्मन्स देखील त्यांच्या इतकाच खास असतो. संगीत समारंभाला चार चांद लावण्यासाठी हे दोन प्रेमी जीव खास कॅन्डललाईट परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

वैदेही आणि मानसचा खास रोमँटिक डान्स परफॉर्मन्स आणि दिमाखदार संगीत सोहळा पाहायला विसरू नका फुलपाखरू मालिकेत सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी युवा वाहिनीवर!!!

Phulpakharu Wedding Sangeet 01

Phulpakharu Wedding Sangeet 02

Phulpakharu Wedding Sangeet 03

Phulpakharu Wedding Sangeet 04

Phulpakharu Wedding Sangeet 05

Phulpakharu Wedding Sangeet 06

Phulpakharu Wedding Sangeet 07

Phulpakharu Wedding Sangeet 08

4 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.00 (2 Votes)
Related Article You May Like
Advertisement