News
Typography

'फुलपाखरू' या मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे - फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे 'फुलपाखरू'. मानस आणि वैदेहीच्या नात्यातील अनेक चढ उतारांनंतर आता ते दोघेही २९ जुलै या शुभदिनी लग्नबेडीत अडकणार आहेत. प्रेक्षक देखील २९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता हा अभूतपूर्व विवाहसोहळा अनुभवून त्यांचे शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा या जोडप्याला देऊ शकतात.

लग्नाची खरेदी, मेहंदी, संगीत, व्याहीभोजन, हळद या सर्व समारंभानंतर अखेर मानस आणि वैदेही यांची लग्न घटिका समीप आली आहे. दोन्ही घरातील कुटुंबीय आणि मित्रपरिवार लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. मानस आणि वैदेहीची कॉलेज गॅंग सर्व तयारीकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत, तसेच मालिकेत नुकतीच एंट्री झालेली हेमांगी कवी म्हणजे मानस आणि वैदेहीची योगा टीचर शाल्मली मॅडम देखील वैदेहीची मदत करण्यासाठी तत्पर आहे. वैदेही आणि मानस जितके खुश आहेत तितकेच नर्वस देखील आहेत. वैदेही तिच्या नववारी साडीत अतिशय सुंदर आणि सोज्वळ दिसतेय. नवरीच्या रूपात तिला पाहून सगळेजण भारावून जातात. अगदी दृष्ट लागेल अशी या नवरीला मानस तिच्या खोलीत लपून भेटायला जातो. वैदेही तिच्या तयारीमध्ये व्यस्त असते पण जेव्हा तिला कळतं मानस तिला भेटायला आला आहे ती लाजते आणि कोणी बघायच्या आत त्याला तिथून जायला सांगते.

वैदेहीच्या मैत्रिणी म्हणजेच तिच्या करवल्यादेखील तिची काही पाठ सोडत नाहीत आणि मानसला तिथून बाहेर काढण्यात त्या यशस्वी होतात. सर्व आनंदी वातावरणात मिठाचा खडा मिसळायला काही विघ्नसंतोषी माणसं देखील या लग्नसोहळ्यात सामील होणार आहेत. मानस आणि वैदेहीचा मित्र गौरव मायाला लग्नाच्या हॉल मध्ये पाहतो आणि चिंताग्रस्त झालेला तो सर्व मित्रांना त्याने तिला पाहिल्याचं सांगतो. मायामुळे आधीच मानस आणि वैदेहीला खूप त्रास झालेला आणि त्यामुळे त्या दोघांच्या नकळत सर्व गॅंग मायाला त्या हॉल मधून बाहेर काढण्यासाठी तिचा शोध घ्यायला सुरुवात करते. आधी मेहंदी मग संगीत आणि आता लग्न, प्रत्येक समारंभात माया चोरून सामील होते आणि तिचा यामागचा उद्देश नक्की काय आहे याचा छडा लावायचा कॉलेज गॅंग ठरवते. तसेच दुसरीकडे मानसच्या कुसुम आत्याचा नवरादेखील या लग्न समारंभात राडा घालायला येणार असल्याचे तो कुसुमला सांगतो. चिंताग्रस्त कुसुम तिच्या नवऱ्याला लग्नात काही गोंधळ करू नकोस अशी विनवणी करते पण तो काही ऐकत नाही.

आता माया आणि कुसुम आत्याचा नवरा या लग्नात काय बाधा आणणार? वैदेही आणि मानसच लग्न सुखरूप पार पडेल का? हे जाणून घेण्यासाठी पहा वैदेही आणि मानस यांचा लग्नसोहळा रविवार २९ जुलै दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता फक्त झी युवा वाहिनीवर!!!

Marriage Photos

Phulpakharu Wedding Marriage 01

Phulpakharu Wedding Marriage 02

Phulpakharu Wedding Marriage 03

Phulpakharu Wedding Marriage 04

Phulpakharu Wedding Marriage 05

Phulpakharu Wedding Marriage 06

Phulpakharu Wedding Marriage 07

Phulpakharu Wedding Marriage 08

Phulpakharu Wedding Marriage 09

Phulpakharu Wedding Marriage 10

Phulpakharu Wedding Marriage 11

Phulpakharu Wedding Marriage 12

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement