News
Typography

झी युवाने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली. मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि लग्न मोडल्यानंतर पराग आणि पूर्वाच्या वाटा वेगळ्या वेगळ्या झाल्या. सध्या अनुष्का आणि परागची लगीनघाई प्रेक्षक पाहत आहेत. दुसरीकडे पूर्वाला मात्र परागसाठी काहीतरी वाटतंय पण ती कोणालाच सांगू शकत नाहीये.

पूर्वाला लग्नासाठी अनेक स्थळं येतात आणि त्यातील एका मुलासोबत पूर्वा लग्न करायचं ठरवते. पराग आणि अनुष्काच्या लग्नाच्या गोष्टी चालू असताना अनुष्का परागसमोर एक वेगळीच अट मांडते. अनुष्का परागला लग्नानंतर कुटुंबापासून वेगळं होण्याचं सांगते. हे ऐकल्यावर पराग द्विधा मनस्थितीत आहे. अनपेक्षितपणे पराग आणि पूर्वा एकमेकांसमोर येतात. पूर्वा पी.एच.डी. च्या निमित्ताने एकमेकांना पुन्हा भेटतात.

परागचं अनुष्काशी लग्न होणार की पूर्वा आणि पराग एकत्र येणार का? हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळेल.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement