News
Typography

‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे’ असं म्हणतात. प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी मार्गदर्शनाची आणि पाठींब्याची आवश्यकता भासते. विशेषत: संकटकाळी काय करावे, कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. कधी कधी दिशाहीन झाल्यासारखे वाटते अश्या परिस्थिती मध्ये आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो. अश्यावेळी परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन भक्ताचा तारणहार बनतो. असेच थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले ज्यांनी सर्वसामान्य लोकांना भक्तिमार्ग दाखवला. ज्यांच्या शक्तीचा प्रत्यय त्यांच्या सत्कर्मातून लोकांना आला, ज्यांनी गरजू लोकांना जवळ केले, त्यांची मदत केली, भरकटलेल्यांना मार्ग दाखविले. लोकपरोपकारार्थ आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या “श्री सद्गरु संत बाळूमामा” यांचे चरित्र आणि त्यांच्यातील दैवत्वाची प्रचिती लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे साक्षात महादेवाचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या “संत बाळूमामा” यांचे जीवन चरित्र. तेंव्हा बघयाला विसरू नका बालमूर्तीच्या मंगल चरित्राचा आरंभ - “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” १३ ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या. ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर. संतोष अयाचित लिखित या मालिकेची निर्मिती साजरी क्रिएटीव्हज यांनी केली आहे.

अकोळ या गावामधील धनगर समाजातील एका कुटुंबामध्ये बाळूमामांचा जन्म झाला. बाळूमामांची आई विठ्ठलभक्त होती. बाळूमामांच्या जन्माआधीपासूनच त्यांच्या आईला हे सत्य उमगले होते की त्यांच्या उदरामध्ये वाढणारे बाळ हे असाधारण आहे. याच गावामध्ये देवऋषी यांचा मोठा धाक होता. या देवऋषीचे एकच ध्येय होते आणि ते म्हणजे कुठल्याही प्रकारे देवपण मिळवणे. तर दुसऱ्या बाजूला बाळूमामा होते ज्यांनी लहानपणापासूनच गरजू लोकांना मदत केली आणि त्यांच्या शक्तीची प्रचीती हळूहळू लोकांना येत गेली. या सगळ्या प्रवासामध्ये बाळूमामांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. आई सुंदराने बाळूमामांना कसे घडवले ? आईबरोबर बाळूमामांचे नातं कसं होतं ? देवऋषी आणि बाळूमामा यांमधील संघर्ष कसा होता हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी - वायाकॉम 18 चे निखिल साने म्हणाले, “ कलर्स मराठीद्वारे आम्ही नेहेमीच नवनव्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळेस आम्ही संत बाळूमामांची गोष्ट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहोत. महाराष्ट्रमध्ये अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी समाजामध्ये जनजागृतीचे कार्य केले. परंतु संत बाळूमामांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागांमध्ये फिरून सगळ्या स्थरांमधील लोकांना एकत्र करून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. या मालिकेद्वारे प्रेक्षकांना संत बाळूमामांचा जीवनप्रवास आणि महात्म्य बघायला मिळणार आहे. तसेच त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा आमचा हेतू आहे”.

मालिकेचे दिग्दर्शक संतोष अयाचित म्हणाले, “महाराष्ट्रात असंख्य गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्या सर्वांपर्यंत पोहचलेल्या नाहीत त्यातलाच एक भाग म्हणजे “बाळूमामा”, ह्या विभूतींचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य. १८९२ साली जन्मलेले बाळूमामा महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्यांच्या मेंढरासोबत ऊन, वारा, पाउस, झेलत पायी फिरले. असंख्य जाती धर्माच्या माणसांना भेटत त्यांची आयुष्य बाळूमामांनी बदलून टाकली. हे इतकं प्रचंड कार्य एका महाकाव्यसारखं आहे. वेगळा काळ, वेगळी पात्रं असलेली ही अलौकिक गोष्ट कलर्स मराठीवर मालिकेच्या माध्यमातून घेऊन येत आहोत.”

वाट चुकलेल्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकेचे निरसन करणारा अवलिया म्हणजेच थोर संत बाळूमामा. बाळूमामांचे हजारो अनुयायी त्यांच्यापुढे आजही नतमस्तक होतात. बाळूमामांच्या मेंढ्याचे कळप अतिशय शुभ मानले जातात. त्यांच्या देवस्थानी त्यांचे अनेक भक्त त्यांच्या समस्यांचे निरसन करण्याकरता जातात. “तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येतो” असं सांगून हजारो लोकांना आधार देणाऱ्या असाधारण माणसाचे म्हणजे संत बाळूमामांचे चरित्र या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बालमूर्तीच्या मंगल चरित्राचा आरंभ - “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” १३ ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या. ७.३० वा फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement