News
Typography

लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे.

२०० भागांचा माईलस्टोन पार केल्या नंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार पण हा आनंदाचा क्षण त्यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला. १०० भाग पूर्ण केल्यावर त्यांनी त्यांचा आनंद अंडर प्रिव्हिलेज मुलांसोबत साजरा केला होता. यावेळी २०१ व्या भागाचं काम चालू करायच्या आधी त्यांनी संपूर्ण टीम जिच्यामुळे हि मालिका यशस्वीरित्या २०० भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर त्यांनी सेटवर केक कापून साजरा केला आणि या यशाच्या मागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काही शंका नाही. कलाकारांनी सांगीतले की कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या मोठ्या दिवसा विषयी बोलताना, सुयश टिळक म्हणाला, "२०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे ही आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही बापमाणूसच्या संपूर्ण टीमसोबत साजरा केला ज्यांच्यामुळे हि मालिका २०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण करू शकली आणि अर्थातच या आनंदाच्या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं आणि ते पुढेही आमची अशीच साथ देतील अशी अाशा करतो."

Baapmanus 200 Episode Celebrations 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement