News
Typography

होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या मंगळसूत्रापाठोपाठ आता झी युवावरील 'फुलपाखरू' या मालिकेतील वैदेहीचं मंगळसूत्र सध्या चर्चेत आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत मानस आणि वैदेही यांचा विवाहसोहळा पाहिला. त्या दोघांचं अगदी थाटामाटात लग्न झालं. लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेलं हे मंगळसूत्र अतिशय लोकप्रिय ठरलं. मालिकेतील कोणती गोष्ट कधी प्रेक्षकांना भावेल हे सांगता येत नाही.

चर्चेत राहिलेली ही दोन्ही मंगळसूत्रे प्रिया कळंबे यांनी तयार केली आहेत. प्रिया यांनी ज्वेलरी डिझाइनची कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. पण आवड म्हणून तयार केलेल्या या मंगळसूत्रांनी खूप पसंती मिळत आहे.
'होणार सून..' या मालिकेतील जान्हवीचं तीन पदरी छोटं मंगळसूत्र अनेकींना आवडलं आणि आजही त्या हे मंगळसूत्र घालताना दिसतात. तसंच वैदेहीचं मंगळसूत्र देखील लोकप्रिय होणार अशी आशा आहे.

Click Here - Vaidehi - Manas Marriage Photos

वैदेहीच्या मंगळसूत्राची खासियत म्हणजे टेम्पल ज्वेलरीच्या डिझाइनच्या मदतीने हे मंगळसूत्र तयार करण्यात आलं आहे. काळ्या मण्यांवर सोनेरी पानांची वेल तयार करून मध्यभागी वाटीत डायमंड बसवण्यात आले आहेत. हे मंगळसूत्र इतर मंगळसूत्रांपेक्षा नक्कीच हटके आहे. यामुळे हे आणखी चर्चेत येण्याची दाट शक्यता आहे.

Vaidehi Mangalsutra Phulpakharu 02

"आताच्या तरूणाईला वेस्टर्न कल्चरसोबत इंडियन कल्चरदेखील सांभाळायचं असते. लग्नानंतर मंगळसूत्र घालण्यात आजच्या मुलींना खूप कुतुहल वाटतं. पण आपल्या वेस्टर्न आऊट फिटवर हे मंगळसूत्र शोभेल असं असलं की त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. आणि याच कल्पनेतून हे डिझाइन तयार करण्यात आलं आहे." असं प्रिया कळंबे सांगतात.

Vaidehi Mangalsutra Phulpakharu 01

Phulpakharu Wedding Marriage 03

Phulpakharu Wedding Marriage 26

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement