News
Typography

लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या फुलपाखरू या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. कॉलेजमधील निरागस प्रेम प्रेक्षकांसमोर आणणारी फुलपाखरू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि त्यातील प्रमुख भूमिकेतील मानस आणि वैदेही ही पात्र तर त्यांच्या मनात घर करून बसली आहेत. या मालिकेने नुकताच ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे.

४०० भागांचा माईलस्टोन पार केल्या नंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार आणि त्यांनी हा आनंद मालिकेच्या सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी फुलपाखरू मालिकेची संपूर्ण टीम सेट वर उपस्थित होती. संपूर्ण टीम जिच्यामुळे हि मालिका यशस्वीरित्या ४०० भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले गेले. हा आभार प्रदर्शनानंतर त्यांनी सेटवर केक कापून साजरा केला आणि या यशाच्यामागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काही शंका नाही. कलाकारांनी सांगीतले की कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मकआणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या मोठ्या दिवसा विषयी बोलताना, हृता दुर्गुळे म्हणाली, "४०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे ही आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. फुलपाखरू या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही फुलपाखरूच्या संपूर्ण टीमसोबत साजरा केला ज्यांच्यामुळे हि मालिका ४०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण करू शकली आणि अर्थातच या आनंदाच्या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं आणि ते पुढेही आमची अशीच साथ देतील अशी अशा करते."

मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारावून गेलेला, मानसची भूमिका करणारा यशोमन आपटे म्हणाला, “हा टप्पा पार केल्यामुळे आम्हाला सर्वांना अतिशय आनंद झाला आहे. आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या आमच्या सर्व चाहत्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. हा एक सुंदर प्रवास होता आणि मला आशा आहे की आम्ही असेच अनेक टप्पे पार करू.”

Celebration Photos

Phulpakharu 400 Episodes 02

Phulpakharu 400 Episodes 03

Phulpakharu 400 Episodes 04

Phulpakharu 400 Episodes 05

Phulpakharu 400 Episodes 06

Phulpakharu 400 Episodes 07

Phulpakharu 400 Episodes 08

Phulpakharu 400 Episodes 09

1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 1.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement