News
Typography

संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २' ने उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणत आहेत. या आठवड्यात संगीत सम्राटाच्या मंचावर खास पाहुणे कलाकार येणार आहेत. सविता दामोदर परांजपे या चित्रपटाची टीम या मंचावर सज्ज झाली.

सुबोध भावे, राकेश बापट, स्वप्नील बांदोडकर, निलेश मोहरीर आणि अमितराज या पाहुण्या कलाकारांनी संगीत सम्राट पर्व २ च्या स्पर्धक आणि कॅप्टन्सना प्रोत्साहित करण्यासाठी मंचावर उपस्थिती दर्शवली. प्रख्यात गायिका अशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत सम्राटमध्ये या आठवड्यातील परफॉर्मन्सेस हे आशाजींना समर्पित करण्यात आले आहेत. सर्व स्पर्धकांनी आशाजींची सुप्रसिद्ध गाणी सादर केली. आदर्श, स्वप्नील आणि राहुल देशपांडे या तिन्ही सुप्रसिद्ध गायकांना प्रेक्षक पहिल्यांदा एकत्र एका मंचावर पाहू शकणार आहेत. त्यांनी 'ए जिंदगी गेले लागले' हे लोकप्रिय गाणं सादर केलं. संगीत सम्राट मधील सुरांची मैफिल पाहून अभिनेता सुबोध भावे देखील स्वतःलागाण्यापासून रोखू शकला नाही. सुबोधने देखील रात्रीस खेळ चाले या गाण्याचे बोल गुणगुणले.

हि सर्व धमाल मस्ती आणि सुरांची मैफिल पाहायला विसरू नका संगीत सम्राट पर्व २ मध्ये बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवावर!!!

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement