News
Typography

सगळीकडेच सध्या मंगलमय वातावरण आहे. कारण लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या आगमनाने भक्ताच्या आयुष्यातील सगळी विघ्न, चिंता दूर होतात कारण तो विघ्नहर्ता आहे. कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. गणपतीच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यातील चिंता आणि संकट दूर होणार आहे. मालिकेमध्ये मोठ्या संकटाना पार करून खूप अडचणीना सामोरे जात लक्ष्मीचे लग्न मल्हारसोबत झाले होते. परंतु तो तिला स्वीकारू शकला नाही कारण त्याचे आर्वीवर जीवापाड प्रेम आहे. परंतु आता मालिकेमध्ये मात्र गणरायाचे आगमन होणार आहे, मल्हार बाप्पाला घरी मोठ्या थाटा माटात घेऊन येताना दिसणार आहे आणि त्याच्या साथीला असणार आहे त्याची बायको म्हणजेच लक्ष्मी. लक्ष्मी घराची सून म्हणून गणरायाचे स्वागत करणार आहे. बाप्पाच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागली आहे.

गणरायाच्या आगमनासाठी लक्ष्मी खूप सुंदर अशी नटली असून तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. गजरे, नथ हातामध्ये हिरव्या रंगाचा चुडा घातला आहे. हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेचा गणपती विशेष भाग संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Laxmi Sadaiva Mangalam Ganapati 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement