Click To Book Tickets

News
Typography

भाद्रपदाची चाहूल लागताच महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच अमाप उत्साहात येणारा, घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. चहूकडे गणरायाच्या मूर्ती, कंठी, सजावटीची साधने, मखर, ढोल – ताशा घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी तयारी करणारी पथकं. सर्वत्र उत्साहाचे, मंगलमय वातावरण असते. गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्न, दु:ख, समस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच एक महिन्या आधीपासूनच तयारी सुरु करतात. यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी कलर्स मराठीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे. वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केले असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले तसेच पुढच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देखील घेतले.

‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील राधा आणि प्रेम (वीणा जगताप आणि सचित पाटील)

बाप्पाच्या आठवणीबद्दल बोलताना राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम देशमुख म्हणजेच सचित पाटील म्हणाला. बाप्पाच्या असंख्य आठवणी आहेत. लहानपणापासूनच्या किती सांगू आणि किती नाही असं होतं. माझ्या आजीकडे गणपती बाप्पा येतो. आम्ही सगळी भावंड मिळून बाप्पाच्या आगमनाची वाट अगदी आतुरतेने बघत असे. टाळ मृदुंगाच्या साथीने “गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत बाप्पाला घरी घेऊन यायचो. यानिमित्ताने सगळ कुटुंब एकत्र यायचं जसं अजुनही येतं. जसे लहान असताना आम्हाला उकडीचे मोदक आवडायचे अगदी तसेच आजही आम्हाला प्रचंड आवडतात. दादर मध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये खूप चैतन्यमय वातावरण असते. त्यादिवसांचीच एक आठवण सांगायची म्हणजे दादर मध्ये जेवढे सार्वजनिक गणपती आहेत तिथे आमच्या लहानपणी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आणि आमची आजी आम्हाला तिथे घेऊन जायची मला असं वाटत या क्षेत्रात येण्याची बीजं कुठेतरी तिकडे रोवली गेली. एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे पर्यावरणाचा विचार आपण सगळ्यांनी करणे खूप महत्वाचे आहे. ECO Friendly अशी गणेशाची मूर्ती घरोघरी आणली जाते जी अत्यंत चांगली गोष्ट आहे. या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये आपण पर्यावरणाचा तोल जाऊ देता कामा नये.

वीणा जगताप म्हणजेच सगळ्यांची लाडकी राधा: आमच्या घरी दरवर्षी बाप्पाचे आगमन होते ज्याची सुरुवात मीच केली.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement