News
Typography

भाद्रपदाची चाहूल लागताच महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच अमाप उत्साहात येणारा, घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. चहूकडे गणरायाच्या मूर्ती, कंठी, सजावटीची साधने, मखर, ढोल – ताशा घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी तयारी करणारी पथकं ... सर्वत्र उत्साहाचे, मंगलमय वातावरण असते... गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्न, दु:ख, समस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच एक महिन्या आधीपासूनच तयारी सुरु करतात. यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी कलर्स मराठीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे. वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केले असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले तसेच पुढच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देखील घेतले.

‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील लक्ष्मी (समृद्धी केळकर), मल्हार (ओमप्रकाश शिंदे) आणि आर्वी (सुरभी हांडे)

कलर्स मराठीवर नुकतीच सुरु झालेली ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे याने देखील काही आठवणी आणि अनुभव सांगितले: मी लहान असताना आमच्या गावी सार्वजनिक मंडळाचा गणपती असायचा. तेंव्हा आरतीला दिला जाणारा प्रसाद रोज वेगवेगळ्या घरातून जायचा. आमच्या घरातून जेंव्हा प्रसाद द्यायचा असायचा तेंव्हा मी बराच प्रसाद मंडळात पोहचवण्यापूर्वीच फस्त करायचो. अर्थात घरी कळू न देता. मला एक सांगावस वाटत गणेशोत्सवाचा मूळ हेतू विसरू नये. ध्वनी, प्लास्टिक आणि इतर होणारे प्रदूषण टाळावे. मंडळामध्ये स्पर्धा असावी पण द्वेष नसावा.

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर हिने देखील काही गोष्टी सांगितल्या: मला आवडणाऱ्या उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. या काळात सगळीकडे आनंदाचं आणि चैतन्यपूर्ण वातावरण असते. आमच्याकडे बाप्पा बसत नाही तरी सुद्धा मी माझ्या आत्याकडे आणि मावशीकडे जाऊन बाप्पाच्या आगमानाची जय्यत तयारी करते. मी नेहेमी बाप्पा आला कि, त्याच्यासमोर आम्हाला कथ्थक मध्ये शिकवलेले कवीत्त सादर करते. एका अर्थाने हा नमस्कारच असतो. मी एक गोष्ट आवर्जून सांगेन आपण सगळ्यांनी छोटी शाडूची मूर्ती आणावी. तिचे जवळच्या एका विहिरीमध्ये किंवा कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे. प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करूया असे मी सर्वांना सांगेन.

आर्वीची भूमिका साकारणारी सुरभी हांडे म्हणाली: श्रावण महिना सुरु झाला कि दिवाळी संपेपर्यंत एक प्रकारचा उत्सवच असतो आणि त्या उत्सवाची, सुखाची सुरुवात गणपती बाप्पा करतो.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement