News
Typography

भाद्रपदाची चाहूल लागताच महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच अमाप उत्साहात येणारा, घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. चहूकडे गणरायाच्या मूर्ती, कंठी, सजावटीची साधने, मखर, ढोल – ताशा घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी तयारी करणारी पथकं. सर्वत्र उत्साहाचे, मंगलमय वातावरण असते. गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्न, दु:ख, समस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच एक महिन्या आधीपासूनच तयारी सुरु करतात. यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी कलर्स मराठीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे. वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केले असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले तसेच पुढच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देखील घेतले.

नवरा असावा तर असा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सगळ्यांच्या लाडक्या हर्षदा खानविलकर.

कलर्स मराठीवरील “नवरा असावा तर असा” या कार्यक्रमकाच्या सूत्रसंचालनाची धुरा ज्यांनी सांभाळली आहे अश्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या हर्षदा खानविलकर यांनी देखील त्यांच्या आणि बाप्पामधल्या अनोख्या नात्याचे काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. माझं आणि बाप्पाचं खूप खास नात आहे असं मी समजते. मला असं वाटत कि, त्याचं देखील माझ्यावर प्रेम आहे. मला छोट्या छोट्या अश्या खूप प्रचीती येत असतात. मुळात माझ्या वडिलांची खूप श्रध्दा होती गणपतीवर. माझा स्वभाव खूप श्रध्दाळू आहे. माझ्या घरात बरेच छोटे मोठे गणपती आहेत, जे मला भेट म्हणून मिळाले आहेत. दर मंगळवारी मला कोणी ना कोणीतरी भेट म्हणून गणपती देतं. हि माझी श्रध्दा आहे कि दर मंगळवारी मला बाप्पा भेट देतो. माझी आणि गणपतीची मैत्री आहे, मी त्याला माझा खूप मोठा आधार मानते.

 

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement