News
Typography

गणपती बाप्पा.... लहान असो किंवा मोठे... हा सगळ्यांचाच लाडका... याच्या येण्याने घरात आनंदी आनंद पसरतो. हा आनंद संपूर्ण महाराष्ट्र सध्या अनुभवतो आहे... याच आनंदात यावर्षी सोनी मराठी चा बने परिवार ही सामील झाला आहे. खास बच्चे कंपनीच्या आग्रहाखातर यंदा बने परिवाराने दीड दिवस गणेशाची स्थापना केली आहे.

बाप्पाच्या आगमनाने 'हमं बने तुमं बने' या बने कुटुंबाचा आनंद द्विगुणित झालाय. यामुळे घरात सगळीकडे आनंद आणि उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय. कुटुंब एकदम खुश आहे आणि गंमत म्हणजे घरात मखर बनवण्याची स्पर्धा सुद्धा रंगली आहे. बाप्पाची आरास करण्यात ही बने परिवाराने कसर सोडली नाही आहे. केलेली सजावट ही इकोफ्रेंडली आहे. इकोफ्रेंडली सजावट करून बने कुटुंबियांनी छान संदेश दिलाय. अगदी निरागसतेने ही सजावट केली गेली आहे. रंगीबेरंगी साज आणि आरास यात बाप्पा विराजमान झालेत.

H M Bane T M Bane Ganapati 02

सगळीकडे आनंद असताना बच्चे कंपनीच्या मनात मात्र बाप्पा आपल्याघरी दिडच दिवस असणार याची खंत आहे. आता नाराज बच्चे कंपनीची समजूत मोठे कसे काढणार आणि कशा पद्धतीने हा उत्सव बनेंच्या घरी साजरा होतोय हे पाहयला विसरू नका 'हमं बने तूमं बने' १३ आणि १४ सप्टेंबर रोजी सोनी मराठी वर.

H M Bane T M Bane Ganapati 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)