News
Typography

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये काही महिन्यांपासून राधा आणि प्रेमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडत होत्या. पण आता राधा तिच्या घरी सुखरूप पोहचली असून, देवयानीचा अचानक मृत्यू झाला आहे. दिपिका आता पूर्णत: एकटी पडली आहे. माधुरीला विक्रमने जे सत्य सांगितले आहे, त्यामुळे माधुरीच्या मनात बरेच प्रश्न आहेत. प्रेम आणि लल्लन हे देवयानी आणि विक्रमची जुळी मुलं आहेत हे सत्य प्रेमच्या देखील समोर येते, जे विक्रमच प्रेमला सांगतो. परंतु हे सगळे खरे नसून प्रेम आणि लल्लन विक्रमची नव्हे तर विश्वनाथ आणि देवयानीची मुलं आहेत. प्रेमला हे सत्य कधी कळेल? हे सत्य कळल्यावर काय होईल? हे बघणे रंजक असणार आहे. या सगळ्यामध्ये आता राधा आणि प्रेमच्या आयुष्यात बाप्पा नक्कीच सुखं घेऊन येईल यात शंका नाही. कारण, राधा आणि प्रेम आता गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करणार आहेत.

“एक चाळ एक गणपती” – राधा आणि प्रेमच्या हस्ते मूर्तीची स्थापना

यंदा चाळीमध्ये एक चाळ एक गणपती अशी कल्पना सगळ्यांनीच मान्य केल्यामुळे, चाळीमध्ये कोणाकडेच गणपती बसणार नाही. चाळीमधील गणपतीचे राधा आणि प्रेम, निंबाळकर परिवार आणि चाळीमधील इतर सदस्य मोठ्या थाटामध्ये गणरायाचे स्वागत करणार आहेत. बाप्पाची एक शाडूची मूर्ती जी विसर्जित केली जाणार आहे आणि दुसरी मोठी मूर्ती ही धातूची असणार आहे. म्हणजेच मालिकेमध्ये देखील पर्यावरणाचा विचार करून हा निर्णय घेतला गेला आहे. तसेच प्रेम सगळ्या लहान मुलांना दहा हजार वह्या आणि पुस्तकांचं वाटप देखील करणार आहे. गणपतीच्या सणानिमित्त मालिकेद्वारे चांगला सामजिक संदेश देखील देण्यात येणार आहे.

तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली मालिकेचा गणपती विशेष भाग तुमच्या लाडक्या राधा आणि प्रेमसोबत रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Radha Prem Rangi Rangli Ganapati 2018 02

Radha Prem Rangi Rangli Ganapati 2018 03

Radha Prem Rangi Rangli Ganapati 2018 04

Radha Prem Rangi Rangli Ganapati 2018 05

Radha Prem Rangi Rangli Ganapati 2018 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement