Click To Book Tickets

News
Typography

‘प्रेमा तुझा रंग कसा’ च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहेत.

Prema Tujha Rang Kasa Star Pravah Host Ajinkya Deo 02

‘प्रेमा तुझा रंग कसा’ च्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथा, त्यातून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरुपं पाहायला मिळतील. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांविषयी आपण ऐकत असतो, वाचत असतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका समाजत घडणाऱ्या याच घटनांविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Prema Tujha Rang Kasa Star Pravah Host Ajinkya Deo 03

स्टार प्रवाहनं नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला आहे. वेगळे विषय,वेगळी मांडणी आणि नवीन कलाकार आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून प्रेक्षकांसमोर आणले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात स्टार प्रवाहची स्वतंत्र अशी ओळख आहे. हीच ओळख अधोरेखित करणार आहे प्रेमा तुझा रंग कसा मालिकेचा दुसरा सीझन. धक्कादायक गुन्हे आणि त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. अजिंक्य देव यांच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे.

तेव्हा पाहायला विसरु नका ‘प्रेमा तुझा रंग कसा’चा दुसरा सीझन १७ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

(समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या मालिकेद्वारे दाखवण्यात येणार्‍या कोणत्याही गुन्ह्याचे/वाईट प्रवृत्तीचे स्टार इंडिया/वाहिनी / निवेदक समर्थन करत नाहीत. तसेच अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा स्टार इंडिया/वाहिनी/निवेदक निषेध करतात.)

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement