News
Typography

झी मराठी वरील नवीनच सुरु झालेली 'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

Tula Pahate Re Marathi Serial 02

नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की एकीकडे ईशाला तिच्या मनात विक्रांतसाठी असलेल्या भावनांची जाणीव झाली आहे, पण दुसरीकडे तिची आई तिचं लग्न बिपीन टिल्लूशी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती विक्रांतना ईशाला समजवायला सांगते पण विक्रांतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतात. ईशा विक्रांतसमोर तिच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते, पण विक्रांत तिला नकार देतो आणि तिला बिपिनशी लग्न करायचा सल्ला देतो. प्रेक्षक आगामी भागात पाहू शकणार आहेत की ईशाच्या वडिलांची नोकरी जाणार आहे आणि त्यामुळे निमकर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवणार आहे. त्यामुळे ईशाची आई तिला बिपिनला होकार देण्याची गळ घालते आणि ईशाकडे दुसरा काहीच पर्याय नसल्यामुळे ती त्याला होकार देणार आहे.

त्यामुळे विक्रांत आणि ईशाच्या प्रेमकहाणीचं पुढे काय होणार? ईशा विक्रांतला विसरणार का? विक्रांतला ईशाबद्दलच्या त्याच्या मनात असलेल्या भावनांची जाणीव होणार का की त्याला जाणीव होई पर्यंत बिपीन आणि ईशाचं लग्न होणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tula Pahate Re Marathi Serial 03

Tula Pahate Re Marathi Serial 04

3 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 3.00 (1 Vote)
Advertisement