News
Typography

नुकतंच 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली आणि त्यामुळे मालिका अजूनच रंजक बनत चालली आहे. शनाया राधिकाचा बदला घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि शानयाच्या अशाच एका चालीमुळे राधिकाच्या अपघात झाला. राधिका शनायामुळे तिच्या जीवाला मुकणार का? तर आगामी भागात प्रेक्षक पाहू शकणार आहेत कि राधिका तिच्या अपघातामुळे कोमामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे राधिकाच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे.

आता कुठे राधिकाच्या एक यशस्वी उद्योजिकेच्या प्रवासाला सुरुवात झाली होती पण त्याला देखील शनायाने ग्रहण लावलं. आता राधिकाच्या गैरहजेरीत तिच्या ऑफिसचं कामकाज कोण पाहणार? राधिकाच्या अपघातामुळे शनायाला तिच्या वागण्याचा पश्चाताप होणार का? गुरुनाथला खरंच त्याच्या चुकांची जाणीव होऊन तो राधिकाच्या काळजी घेणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

Radhika Majhya Navryachi Bayako 01

Radhika Majhya Navryachi Bayako 02

Radhika Majhya Navryachi Bayako 03

Radhika Majhya Navryachi Bayako 04

5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 5.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement