News
Typography

सध्या 'आम्ही दोघी' मालिकेत प्रेक्षक मधुरा, मीरा आणि आदित्य चा लव्ह ट्रँगल अनुभवत आहेत. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की आदित्यने मीराबद्दलच्या भावना व्यक्त केल्यावर मधुराने देखील तिला आदित्य आवडतं असल्याचं सगळ्यांसमोर कबूल केलं. फक्त कबूलच नाही तर तो फक्त तिचाच आहे असं ठणकावून सगळ्यांना सांगितलं.

Aamhi Doghi Aditya Meera 05

आदित्य आणि मधुराच्या या बोलण्यामुळे संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित झालं आहे. आदित्य आणि मीरा मधुराला वेळ मारून नेण्यासाठी सगळ्यांसमोर आदित्यला तसं बोलावं लागलं असल्याचं सांगतात आणि हे कळल्यापासून मधुरा आदित्यला इम्प्रेस करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती कुठल्याही थराला जायला मागे पुढे बघत नाहीये. आदित्यचं मन जिंकण्यासाठी मधुरा मीराला त्याच्या नजरेत खाली पडायचा, तिला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आदित्य देखील तिच्या वागण्यातील बदल अनुभवत आहे.

मधुरा आदित्यला मीरापासून तोडण्यात यशस्वी होईल का? मधुराच्या नकळत मीरा आणि आदित्य एकत्र येतील का? हे प्रेक्षक आगामी भागात पाहू शकतात.

Aamhi Doghi Zee Yuva Serial Khushboo Shivani 02

Aamhi Doghi Aditya Meera 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement