News
Typography

संपूर्ण आठवडा प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलर्स मराठीवरील आवडत्या मालिका या सोमवारी घेऊन येणार आहेत खास भाग. म्हणजेच प्रेक्षकांसाठी पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी २४ सप्टेंबरला संध्या ७ वाजल्यापासून असणार आहे मनोरंजनाची पर्वणी. प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांमध्ये घडणार आहेत बऱ्याच घटना. लक्ष्मी सदैव मंगलम्, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली मालिकांना येणार आहे रंजक वळण. प्रेक्षकांना देखील हे विशेष भाग बघण्याची बरीच उत्सुकता असते. तेंव्हा तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये काय घडणार आहे, कोणते नवे वळण येणार आहे हे बघायला विसरू नका सुपरहिट सोमवारमध्ये २४ सप्टेंबरला संध्या. ७ वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये सध्या श्रीकांतच्या नव्या नव्या डावपेचांमुळे आणि कारस्थानांमुळे लक्ष्मी बरीच त्रस्त आहे. यातून काय आणि कसा मार्ग काढावा हे देखील तिला कळत नाही. परंतु लक्ष्मी कोणत्या तरी अडचणीमध्ये आहे याची कल्पना अजिंक्यला आलेली आहे. मालिकेमध्ये आता मल्हार आणि आर्वीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. यामध्येच लच्छी मला आवडत असल्याचे अजिंक्य आर्वीला सांगणार आहे. परंतु याची कल्पना लक्ष्मी आणि मल्हारला नाहीये. मल्हार आणि आर्वीचा लग्नसोहळा सुरळीत पार पडत असतानाच, मंगळसूत्र गायब होतं पण ते लक्ष्मी आणून देते. लक्ष्मी मंगळसूत्र कसं आणून देते ? नक्की काय होते ? कोण गायब करतं ? हे सगळं जाणून घेण्यासाठी बघा लक्ष्मी सदैव मंगलम्.

प्रेक्षकांची आवडती मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये बाळूमामा आणि त्यांचा संपूर्ण परिवार हलसिध्दनाथांचं दर्शन घेऊन आल्यावर प्रसाद करण्याचा निर्णय घेतात. परंतु याचवेळेस श्रेयाळशेठची पूजा पंच त्यांच्याकडे ठेवणार आहेत असा निर्णय घेतात आणि त्यामुळे संपूर्ण गाव पंचाकडे पूजेला जाणार असं तात्या बाळूमामांच्या परिवाराला येऊन सांगतात. त्यामुळे आता बाळूमामांकडे प्रसादाला कोणी येणार का ? असा प्रश्न असतानाच बाळूमामा पांडुरंगाचे नामस्मरण करतात आणि यातून तूच मार्ग दाखव अशी विनंती करतात. पुढे काय होईल ? पांडुरंग आणि बाळूमामांची भेट कशी होईल ? हे सगळं प्रेक्षकांना सोमवारच्या भागामध्ये कळेल.

घाडगे & सून मालिकेमध्ये माईंना कर्करोग झाल्यामुळे, अमृता माईना कसं बरं वाटेल याच धडपडीमध्ये होती. आता माईंनी त्यांना झालेल्या आजाराचे सत्य संपूर्ण परिवाराला सांगितले आहे आणि त्या आजारामधून बऱ्या होत आहेत असे देखील सांगितल्यामुळे सगळ्यांना थोडा धीर मिळाला आहे. परंतु हे सगळे ऐकल्यानंतर अक्षय माईंना भेटायला घाडगे सदन मध्ये येतो तेंव्हा अमृता त्याला सांगते कि, ती अक्षय आणि कियारासाठी जवळपास एक घरं शोधून देण्यासाठी मदत करेल. आता अक्षय आणि कियारा बाजूला राहायला आल्यावर काय होईल ? घाडगे परिवार आणि माई अक्षय आणि कियाराचा स्वीकार करतील का ? अक्षय कियारासोबत घाडगे सदन मध्ये परतू शकेल का ? हे जाणून घेण्यासाठी बघा घाडगे & सून.

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये दीपिकाची आई म्हणजेच देवयानी परतली असून आता मालिका रंजक वळणावर पोहचणार आहे. प्रेमने दीपिकाचे आयुष्य आणि व्यवसाय मार्गावर आणण्यासाठी काही दिवसांसाठी प्रेम म्हणून दीपिकासोबत रहाण्याचा निर्णय घेतला आहे, तर लल्लनला प्रेम म्हणून राधासोबत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, हे सगळं तो राधाला विश्वासात घेऊन करणार आहे. राधा याचा स्वीकार करून प्रेमला साथ देण्याचा निर्णय घेणार आहे. प्रेम स्वत:ची स्वप्न, इच्छा यांचा त्याग करून तर दुसरीकडे राधा एक आदर्श सून, बायको बनून तिच्या इच्छा बाजूला ठेऊन दीपिकासाठी हे सगळे करणार आहेत. दीपिका कितीही वाईट वागली तरी तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे असं प्रेमचं मत आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये राधा आणि प्रेमला दीपिका एकत्र बघते, जेंव्हा ती लल्लनसोबत असते जो दीपिकासाठी प्रेमचं आहे. दीपिकासोमरं लल्लनचं सत्य येईल का ? राधा आणि प्रेम खरोखर दीपिकासोमर येतील का ? तरं दुसरीकडे देवयानी परतल्यामुळे अजून एक सत्य बाहेर येणार आहे कारण देवयानी आणि डॉ. आनंद एकत्र काय बोलत आहेत ? देवयानी, डॉ. आनंद आणि दीपिका मध्ये काय संबंध आहे ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना पुढच्या आठवड्यामध्ये मिळणार आहेत.

तेंव्हा बघयला विसरू नका लक्ष्मी सदैव मंगलम्, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली यांचे भाग सुपरहिट सोमवारमध्ये २४ सप्टेंबरला संध्या. ७ वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement