News
Typography

‘स्टार प्रवाह’च्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेच्या सेटवर नुकताच पिठलं भाकरीचा बेत रंगला. या मालिकेत श्रीधरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षर कोठारीला पिठलं खूप आवडतं. त्याने त्याची आवड सेटवर सांगताच दुसऱ्याच दिवशी पिठलं भाकरीचा खास बेत आखण्यात आला. मालिकेत अक्षरच्या आईची भूमिका साकारणाऱ्या वंदना वाकनीस यांनी अक्षरसाठी खास पिठलं बनवून आणलं. तर मालिकेचा प्रोडक्शन मॅनेजर विशाल मोरेनेही अक्षरसाठी पिठलं आणून त्याला खास सरप्राइज दिलं. या अनोख्या मेजवानीने अक्षर खूपच भावूक झाला होता.

Chhoti Malkeen Pithale Party 01

"मालिकांचा सेट हे आम्हा कलाकारांसाठी दुसरं घर असतं आणि सहकलाकार म्हणजे कुटुंब. दिवसातला बराच वेळ सेटवर जात असल्यामुळे अश्या आनंदाच्या क्षणांची आम्ही वाट पहात असतो. सेटवरच्या याच छोट्या मोठ्या गोष्टी नवा हुरुप देत असतात. स्टार प्रवाह आणि प्रोडक्शन हाऊस आम्हा कलाकारांची मनापासून काळजी घेतात. म्हणूनच तर पडद्यामागे दिसणारी केमिस्ट्री सीनमधूनही खुलून येते." असं मत अक्षर कोठारीने व्यक्त केलं.

तेव्हा पाहायला विसरु नका ‘छोटी मालकीण’ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Chhoti Malkeen Pithale Party 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement