News
Typography

झी युवाने अवघ्या २ वर्षांच्या कालावधीतच वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कथा आणि त्यांच्या सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी युवा यावाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. झी युवा वाहिनीच्या प्रेक्षकांची ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील तितक्याच धमाकेदारपणे होणार आहे कारण झी युवा आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'तू अशी जवळी रहा' ही नवी मालिका सादर करणार आहे. या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची.

Tu Ashi Javali Raha Zee Yuva Serial 01

मालिकेत सिद्धार्थ बोडके राजवीर मोहिते पाटीलची भूमिका निभावणार आहे, जो एक अत्यंत चाणाक्ष मुलगा आहे. ज्याला पराभव मान्य नाहीये आणि दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी मुलगी आहे. ही बाकीच्या प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे. एकमेकांच्या विरुद्ध स्वभाव असणारे हे दोघे प्रेमासाठी त्यांची तत्व बाजूला नाही करू शकत. त्यांच्यातील वेगळ्या स्वभावामुळे त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांभोवती मालिकेचे कथानक फिरणार आहे. ही कथा राजवीरचं मनवावर असलेल्या वेड्या प्रेमाची तर आहेच पण मनवा त्याच्या वेड्या प्रेमाला कसं जिंकणार याने मालिकेला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

Tu Ashi Javali Raha Zee Yuva Serial 02

मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून त्यातून सिद्धार्थ बोडकेची व्यक्तिरेखा आणि तितिक्षाच्या पात्राची त्यावरील प्रतिक्रिया यावरून प्रेक्षकांची मालिकेसाठीची उत्कंठा अजूनच वाढली आहे. या आव्हानात्मक भूमिकेबद्दल सांगताना तितिक्षा म्हणाली, "या मालिकेतील मनवाची भूमिका ही मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. आव्हानात्मक भूमिका नेहमीच आपल्याला चांगलं काम करण्याचा उत्साह देतात. एका वेड्या प्रेमाची कथा जी कदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते, पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. पण ही मालिका त्याकडेच भर देऊन अशी कथा सगळ्यांसमोर आणू इच्छिते. मी मनवाच्या पात्राशी रिलेट करू शकते. या मालिकेचे कथानक अत्यंत रंजक आहे जे प्रेक्षकांना त्यांच्या टीव्ही स्क्रिनला खिळवून ठेवील."

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement