News
Typography

बाळूमामाच्या नावानं चांगभल या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच संत बाळूमामा यांच जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच घटना घडत आहेत. बाळूबद्दल येणाऱ्या सततच्या तक्रारींना कंटाळून त्याच्या आईने बाळूकडून घरामधून बाहेर न पडण्याचं वचन घेतलं. पण, ह्याच वेळी गावावर अनेक संकट आली. पण आईच्या वचनात बांधलेला बाळू मात्र काहीच करू शकला नाही. याचाच फायदा घेऊन पंच मात्र गावात घडणाऱ्या गोष्टींच खापर बळूवर फोडतो.

बाळूमामा हे वचन कधी पर्यंत पाळू शकतील का ? याच दरम्यान देव्प्पाच्या कारस्थानामुळे मयप्पाच्या वागण्यामध्ये अचानक झालेला बदल सुंदरा आणि घरातल्यांना कळत नाही आहे. गावावर आलेल्या या संकटात नवी भर म्हणजे सरकारला द्यावा लागणारा कर. गावकऱ्यांवर अचानक कोसळलेल्या या संकटावर बाळू कशी मात करणार हे बघणे उत्सुकतेच असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका विठ्ठल आणि बीरदेवाच्या साथीने गावावर आलेले हे संकट बाळूमामा कसे दूर करतील.

Vitthal Beerdev Balumama 02

धान्यावर पडलेल्या किडीमुळे कर भरण गावकऱ्यांना अशक्य झालं आहे.  ह्या सगळ्या संकटात पंचाने मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे गावकरी हताश झाले आहेत. अशातच बाळूच्या मदतीला धावून आले विठ्ठल बीरदेव. आता विठ्ठल बीरदेव यांच्या मदतीने बाळू संकटावर कसे मात करणार हे बघायला विसरू नका बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत सोम ते शनि संध्या ७.३० वा.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement