News
Typography

'आम्ही दोघी' मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी नवीन मधुरा पाहिली. शिवानी रांगोळे जी मधुराची भूमिका साकारत होती तिला काही कारणास्तव हि मालिका सोडावी लागली आणि तिच्या जागी प्रसिद्धी किशोर ही मधुराची भूमिका निभावतेय. पण प्रसिद्धी शिवाय मालिकेत अजून एक नवीन एंट्री प्रेक्षकांनी पाहिली.

सध्या चालू असलेल्या ट्रॅक नुसार मालिकेत मधुराला मीरा आणि आदित्यच्या नात्याबद्दल कळतं आणि जिद्दी मधुरा आत्महत्येचं नाटक करते, जेणेकरुन मीरा तिला वाचवण्यासाठी आदित्य पासून दूर जाण्याचं वचन देईल आणि तसंच घडतं. आदित्यला या घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. दुसरीकडे मीरा मधुराला दिलेल्या वचनामुळे घर सोडायचा निर्णय घेते. मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या मीराची भेट कामत नावाच्या एका इसमाशी होते आणि योगायोगाने तो माणूस मीराला ओळखतो. या व्यक्तीची भूमिका अभिनेता शरद पोंक्षे निभावत आहे.

Aamhi Doghi Serial New Entry 02

कामत यांचं मीराला भेटण्याचं आणि तिला मदत करण्याचं उद्दिष्ट नक्की काय असेल? मीरा वाटेतून दूर झाल्यामुळे आता मधुरा आदित्यला जिंकू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका आम्ही दोघी सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त झी युवा वर!!

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement