News
Typography

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रम सध्या बराच चर्चेमध्ये आहे. आजवर कार्यक्रमामध्ये नामवंत कलाकारांनी आणि इतर क्षेत्रामधील दिग्गज व्यक्तिंनी हजेरी लावली. या दरम्यान त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच माहिती नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांना कळाल्या, तसेच त्यांची दुसरी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळाली. या मंडळींनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. येत्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे श्री.अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर. या दोघांसोबत मकरंद अनासपुरे बऱ्याच गप्पा मारणार आहेत तसेच या दोघांनाही बरेच बेधडक प्रश्न देखील विचारले जाणार आहेत. आता या प्रश्नांची उत्तरे हे काय देतील, कोणते किस्से ऐकायला मिळतील हे बघणे मोठ्या उत्सुकतेचे असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील विशेष भाग शुक्रवारी म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

अशोक चव्हाण यांनी मकरंद अनासपुरे यांच्या प्रश्नांची उत्तर एकदम रोखठोक आणि बेधडकपणे दिली. शाळेमध्ये असताना अशोक चव्हाण गणितामध्ये जरा कच्चे होते पण मग राजकीय गणित एवढ्यामोठ्या प्रमाणात कशी सांभाळता ? हा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर ऐकण्यासारखे आहे. “मी राजकीय गणितात देखील कच्चाच आहे, पक्का नाही झालो... मला कधीच खरा आणि खोटा चेहरा हा प्रकार जमला नाही... मी माझ्या मतदार संघातील लोकांना आणि सहकाऱ्यांसाठी अव्हेलेबल असतो. राजकारणात खोट बोलण सोयीच आहे... समोर एक बोलतात आणि मागे दुसरच बोलतात हे आम्हांला माहिती असत पण आम्हांला हे जमले नाही... जे तोंडावर आहे तेच माघारी पण आहे” असे ते म्हणाले.

Mahesh Manjrekar Ashok Chavan Assal Pahune Irsal Namune 02

कार्यक्रमामधील चक्रव्ह्यू राउंड मध्ये मकरंद अनासपुरे यांनी श्री. अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर यांना काही प्रश्न विचारले ज्याची उत्तर दोघांनीही बिनधास्तपणे दिली. अशोक चव्हाण यांना या राउंड मध्ये राजकीय क्षेत्रातील काही व्यक्तीं संदर्भात प्रश्न विचारले – श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक आवडणारी आणि एक नावडती गोष्ट, तर कोणाचा कारभार जास्त पारदर्शक आहे – श्री. नरेंद्र मोदी कि श्री. देवेंद्र फडणवीस, उत्तम वक्ता कोण राहुल गांधी कि श्री. नरेंद्र मोदी... याच राउंड मध्ये राज ठाकरे यांबद्दल बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले “मित्र असावा तर राज थारे सारखा”... तसेच कार्यक्रमामध्ये मकरंद यांनी अशोक चव्हाण यांना पेट्रोल पंपावर माननीय पंतप्रधान यांचे फोटो बघून तुम्हाला काय वाटत ? असे विचारले तेंव्हा ते म्हणाले, “आज एकिकडे पेट्रोलची किंमत शंभरी गाठण्याच्या परीस्थीतीमध्ये आहे आणि दुसरीकडे त्यांचा हसरा चेहरा. लोकांना रडू येते आहे अशी अवस्था झालेली आहे पेट्रोल पंपावर”.

Mahesh Manjrekar Ashok Chavan Assal Pahune Irsal Namune 03

तर महेश मांजरेकर यांना देखील काही प्रश्न विचारले सलमान खान कि संजय दत्त ? नटसम्राट चित्रपटा मध्ये कोणाचा अभिनय आवडला नाना पाटेकर कि विक्रम गोखले ? बिग बॉस मराठीमधील आवडती स्पर्धक कोण मेघा धाडे कि स्मिता गोंदकर ?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि किस्से जणून घेण्यासाठी बघा अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील विशेष भाग शुक्रवारी म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement