News
Typography

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना दर आठवड्याला मनोरंजनाची पर्वणी मिळते. प्रत्येक भागामध्ये मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारतात. या आठवड्यामध्ये सुध्दा असेच काही लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हे कलाकार देखील कार्यक्रमामध्ये त्यांचे काही अनुभव, काही माहित नसलेले किस्से प्रेक्षकांना सांगणार आहेत. कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये गिरीश कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी तसेच कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या नायिका सुखाच्या सरींनी हे मन बावरे मधील मृणाल दुसानिस, घाडगे & सून मधील भाग्यश्री लिमये आणि राधा प्रेम रंगी रंगली मधील वीणा जगताप हे कलाकार मकरंद अनासपुरे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमाचा येत्या गुरु आणि शुक्रचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Mrunal Bhagyashree Veena Assal Pahune Irsal Namune 05

कार्यक्रमामध्ये आलेल्या मंडळींसोबत खुसखुशीत विनोद, चर्चा आणि किस्से तर रंगलेच पण मृणाल दुसानिसने एक सुंदर गाणे देखील सादर केले. तसेच मकरंद यांनी अमृताला म्हणजेच भाग्यश्रीला तिला कुठल्या गोष्टीचा राग येतो हे विचारले असता भाग्यश्रीच उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. भाग्यश्री म्हणाली “मला प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे. आणि अगदी मुंगीला सुध्दा जर माझ्यासमोर मारल तर मला खूप राग येतो. आणि रागात मी रडायला लागते. लहानपणी मी माझ्या फ्रेडन्सना सांगायचे कसे आपण सहनशील व्हायला हवं. प्राण्यांना मारू नये. डासांना मारायचे नाही. तेंव्हा मी तिसरीत होती." हे ऐकताच सगळ्यांना हसू आवरले नाही. यानंतर कशाची भीती वाटते असे विचारले असता भाग्यश्रीला वाघांची भीती वाटते असे ती म्हणाली. त्यावर मकरंद यांनी खूपच गमतीशीर प्रश्न विचारला कि, अमेय वाघ बरोबर काम करशील का ? यावर ती काय म्हणाली याच उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला कार्यक्रम बघावा लागेल.

Mrunal Bhagyashree Veena Assal Pahune Irsal Namune 03

Mrunal Bhagyashree Veena Assal Pahune Irsal Namune 02

तसेच मालिकांमधील नायिकांनी साडी मुक्त व्हावे यावर देखील या तिघींनी त्यांचे म्हणणे मांडले. भाग्यश्री म्हणाली मालिकेमध्ये साडी नेसलेली नायिका खूप सुंदर दिसते पण आम्हाला तसा त्याचा त्रास होतो. खूप उकडत. वीणाने देखील सांगितले साडी नेसायला देखील वेळ लागतो. या तिघींचे म्हणणे सारखे होते. मृणाल देखील म्हणाली, आता कुठलीही मुलगी साडी नेसून घरामध्ये वावरत नाही. सासरी देखील आता असं काही राहिलेले नाही कि, मुलीने साडीच नेसली पाहिजे. जर हा बदल समाजामध्ये होतो आहे तर आपण देखील मालिकांमध्ये हा बदल दाखवला तर चालू शकतो.

Mrunal Bhagyashree Veena Assal Pahune Irsal Namune 04

तसेच अभिनयाची उमज आणि सामाजिक समज असलेले दोन बहुरंगी नट म्हणजेच गिरीश कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी यांनी देखील कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. चक्रव्ह्यू राउंड मध्ये जितेंद्र आणि गिरीश यांनी मिळून मकरंद यांनाच प्रश्न विचारले आहेत. तेंव्हा ही सगळी धम्माल मस्ती बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमाचा येत्या गुरु आणि शुक्रचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement