News
Typography

‘सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली.. आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली’. दिवाळी म्हण्टलं की दिव्यांची आरास, रांगोळी, फराळाची सुग्रास मेजवानी आणि नातेवाईकांसोबत घालवलेले खास क्षण आठवतात. खरतर कुटुंबाला एकत्र आणणं हाच या सणाचा मुळ उद्देश. प्रेक्षकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सज्ज आहे. ‘दिन दिन दिवाळी’ या खास कार्यक्रमातून मनोरंजनाची आतषबाजी अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, मृण्मयी देशपांडे, मानसी नाईक, पर्ण पेठे, मयुरेश पेम यांच्या धडाकेबाज डान्स परफॉर्मन्सेससोबतच स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवती आणि ‘ललित २०५’ मधील नील यांचा अनोखा अंदाज प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

नृत्याच्या जोडीला या खास कार्यक्रमात जबरदस्त गाण्यांची मेजवानी देखिल असेल. आदर्श शिंदे, आर्या आंबेकर, हृषिकेश रानडे आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी सादर केलेल्या जबरदस्त गाण्यांनी दिवाळीची रंगत आणखी वाढणार आहे. या खास मैफलीला आणखी स्पेशल करणार आहेत सुमीत राघवन आणि अतुल परचुरे. लेकुरे उदंड झाली आणि व्यक्ती आणि वल्ली या सुपरहिट नाटकांमधले सुपरहिट प्रसंग या दोघांनी ‘दिन दिन दिवाळी’ या खास कार्यक्रमात सादर केले आहेत.

Click here for More Photos of Din Din Diwali

तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहचा दिवाळी विशेष कार्यक्रम ‘दिन दिन दिवाळी’ रविवार ४ नोव्हेंबरला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त आणि फक्त स्टार प्रवाहवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement