News
Typography

आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर यांची संपूर्ण टीम कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये देखील हजेरी लावणार असून या कार्यक्रमामध्ये बरीच धम्माल मस्ती केली आहे. तसेच काही विषयांवर स्पष्टपणे वक्तव्य देखील केले आहे. सुबोध भावेने मराठी रंगभूमी आणि चित्रपटाचा त्याला अभिमान आहे असे त्याने सांगितले आहे. सुमीत राघवन आणि आनंद इंगळे यांच्यामध्ये एक खेळ खेळण्यात आला आहे ज्यामध्ये एक अमुक शब्द काय आहे हे अभिनयाने ओळखायचे आहे.

तसेच चित्रपटाच्या कलाकारांमध्ये पुणे आणि मुंबई अश्या दोन टीम करण्यात आल्या आहेत. पुणे टीम मध्ये सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि आनंद इंगळे तर मुंबई टीम मध्ये सुमीत राघवन आणि वैदेही परशुरामी असणार आहेत. यांना त्यांच्या शहरांनुसार माणुसकी, खवय्येगिरी, गर्दी आणि भाषा यांच्या काय व्याख्या आहेत असे विचरण्यात आले. आता यावर हे मंडळी काय उत्तर देण्यात हे बघण्यासारखे असणारा आहे. तसेच त्यांचे भीती, अपमान, राग या विषयांवर त्यांना आलेले अनुभव आणि कधी न ऐकलेले किस्से देखील ऐकायला मिळणार आहेत.

वैदेही परशुरामीला तिला कुणावर आधारित असलेल्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असे विचारले असता ती म्हणाली “रेखा” आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेमध्ये कोण आवडेल यावर ती म्हणाली, “सुबोध भावे बरोबर काम केले आहे तर, सुमीत राघवन अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेमध्ये आवडतील”.

तसेच सुबोध भावेला दोन सिनेमांमधून एका चित्रपटाची निवड करण्याचे मोठे आव्हान दिले – बालगंधर्व कि लोकमान्य – एक युग पुरुष कोणता चित्रपट आवडीचा आहे यावर तो म्हणाला, बायोपिकची सुरुवात बालगंधर्व या चित्रपटापासून झाली ... म्हणून बालगंधर्व”

तेंव्हा बघायला विसरू नका 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'चा दिवाळी विशेष भाग “आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत ८ आणि ९ नोव्हेंबर रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement