News
Typography

कलर्स मराठीवरील मालिका आणि कार्यक्रम यांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेची कथा, मालिकेतील कलाकार प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवत आहेत. आता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना विविध विषयांवरील, वेगळ्या विषयांवर – संकल्पनेवर आधारित असलेले चित्रपट बघण्याची संधी मिळणार आहे. येत्या रविवारी वायकॉम18 मोशन पिक्चर्सचा “सायकल” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता आता हा चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे त्यांच्या आवडत्या वाहिनीवर म्हणजेच कलर्स मराठीवर २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्या. ७ वा. या चित्रपटामध्ये भालचंद्र कदम, प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी, दीप्ती लेले, मैथिल पटवर्धन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले असून लेखिका अदिती मोघे आहेत. अनेक पुरस्कार मिळवत आणि परदेशातही सफारी करून आलेल्या सायकलची गोष्ट येत आहे तुमच्या भेटीला कलर्स मराठीवर. आयुष्याला समृध्द करणाऱ्या एका “सायकल”चा प्रवास बघायला विसरू नका फक्त कलर्स मराठीवर.

“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा असून या चित्रपटाद्वारे तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात स्वत:च्या सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी अचानक केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे केशव अत्यंत निराश होतो. परंतु त्याला आशा आहे कि सायकल नक्की परत मिळेल. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना तो कसा अनभिज्ञपणे चोरांना भेटतो? प्रवासा दरम्यान त्या चोरांचे आयुष्य कसे बदलते ? केशवला त्याची सायकल परत मिळते का ? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.

Cycle World Television Premiere 01

कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली सायकल हा सिनेमा चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकारांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकतो.

आयुष्याला समृध्द करणाऱ्या एका “सायकल”चा प्रवास बघायला विसरू नका २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्या. ७ वा. फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement