News
Typography

दिवाळीचा सण सरला आणि तुळशीचं लग्न लागलं, की सुरूवात होते लगीन सराईला. लग्न... एक असा सण, ज्यात दोन जीवांचं होतं मिलन. जितकी तयारी एखाद्या सणाची व्हावी त्याच्या दुपटीने, लग्नाची तयारी केली जाते. हीच लगीनघाई सध्या पाहायला मिळते आहे सोनी मराठीवर सुरू असलेल्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत... निमित्त आहे श्रुती-कार्तिकच्या लग्नाचं.

तसं पाहायला गेलं तर हे अरेंज मॅरेज. पण या दोघांमध्ये प्रेम कधी उमललं त्यांचं त्यांनाही नाही कळलं. या दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर बॉक्सिंगच्या प्रेमाखातर श्रुतीने लग्नापुढे केलेली बॉक्सिंग ची निवड आणि त्यामुळे मोडलेला यांचा साखरपुडा. नव्याने फुलणाऱ्या या गोड नात्याला पूर्णविराम लागतो की काय असं वाटत असतानाच कार्तिकच्या पुढाकाराने शेवटी हे सुत जुळलं. दुरावा सहन न झाल्याने कार्तिक ने श्रुतीच्या सरांना लग्नानंतर श्रुतीच्या बॉक्सिंगवर काहीही परिणाम होणारी नाही, असं वचन देत लग्नासाठी परवानगी मिळवली. आणि तुळशीच्या लग्नानंतरचा पहिला मुहूर्त बघून आपल्या लग्नाचा बार उडवून द्यायचा निर्णय घेतला आहे.

Sare Tujhyachsathi Wedding Invitation

लग्नाआधी मनाला लागणारी हूरहूर या दोघांच्या ही चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसते आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये आता लगीनघाई सुरू झाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात एकमेकांसाठी निर्माण झालेली ओढ. त्या ओढीतून सहवासासाठी शोधली जाणारी वेगवेगळी कारणं ‘सारे तुझ्याचसाठी’ या कार्यक्रमाच्या शीर्षकाला अगदी तंतोतंत लागू पडत आहेत. लग्नसोहळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आमंत्रणाचं. याला 20 तारखेपासून सुरूवात होणार आहे तर याच दरम्यान त्यांचं केळवण ही होणार आहे. 22 ला कार्तिकची बॅचलर्स पार्टी तर 23 ला मेंदीचा कार्यक्रम आहे. 24 ला हळद आणि 26 तारखेला हे दोन वेगळ्या ध्रुवावरचे जीव एकत्र येणार आहेत.

वेगळे स्वभाव, वेगळी व्यक्तीमत्त्व, विरूध्द टोकाच्या आवडी जोपासणाऱ्या श्रुती – कातिर्कच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सोनी मराठीवर सुरू आहे.

बॉक्सिंगची शास्त्रीय संगीताशी बांधली जाणार आहे गाठ
म्हणूनच 26 नोव्हेंबर 2018 ला शाही लग्न सोहळ्याचा घातलाय घाट

तेव्हा बॉक्सिंगचा संगीताशी होणारा हा मेळ अनुभवायला... लग्नाला यायचंच!

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement