News
Typography

सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या घरावर नुकताच ‘स्पेशल ५’ च्या टीमने छापा मारला. या छाप्यासाठी कारणीभूत ठरली महेश कोठारे यांची प्रसिद्धी. ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे. महेश कोठारे यांना आपण बऱ्याच सिनेमांमध्ये धडाकेबाज पोलिस इन्सपेक्टरच्या भूमिकांमध्ये पाहिलंय. त्यांचा सळसळता उत्साह तरुणाईला नवी ऊर्जा देतो. महेशजींच्या या एनर्जीमागे नेमकं काय रहस्य आहे हेच जाणून घेण्यासाठी ‘स्पेशल ५’ च्या टीमने त्यांच्या घरावर छापा टाकला.

‘स्पेशल ५’ ची ही टीम स्टार प्रवाहवरील नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर ५ जिगरबाज पोलीसांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे.

Special 5 New Marathi Crime Serial 01

महेश कोठारेंसोबत रंगलेल्या मनसोक्त गप्पांमधून ‘स्पेशल ५’ च्या टीमला बऱ्याच टीप्स मिळाल्या आणि ही भेट खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली.

तेव्हा ‘स्पेशल ५’ टीमची शौर्यगाथा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. १० डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement