News
Typography

झी युवा लवकरच 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. अप्सरा आली हे ठसकेदार गाणं आणि या गाण्यातून जिने अख्ख्या महाराष्ट्राला घायाळ केलं ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे. तिच्या मनमोहक अदा आणि सौंदर्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. अनेक सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलेली सोनाली आता एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी खुद्द 'अप्सरा आली' या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका निभावणार आहे.

या कार्यक्रमात स्पर्धक महाराष्ट्रातील लोकनृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमात अखंड महाराष्ट्रातील टॅलेंटप्रेक्षकांना पाहायला मिळेल, तसंच या कार्यक्रमात प्रेक्षक अनेक अदाकारा आणि त्यांच्या लावणीचा ठसका पाहू शकणार आहेत. नुकतंच या कार्यक्रमाचा टिझर प्रोमो रिलीज झाला असून प्रेक्षकांची कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. अप्सरा आली हा कार्यक्रम ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हा कार्यक्रम आणि तिच्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, "डान्स हे माझं पहिलं प्रेम आहे आणि अप्सरा आली सारख्या डान्स रिऍलिटी शोच परीक्षण करण्याची माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील लोकनृत्य या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे तसंच 'अप्सरा आली'मुळे लावणी नृत्याची परंपरादेखील प्रेक्षक पाहू शकतील. त्यामुळे मी या कार्यक्रासाठी खूप उत्सुक आहे आणि प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक असतील याची मला खात्री आहे."

Sonalee Kulkarni Apsara Aali Judge 01

Sonalee Kulkarni Apsara Aali Judge 02

Sonalee Kulkarni Apsara Aali Judge 03

Sonalee Kulkarni Apsara Aali Judge 04

Sonalee Kulkarni Apsara Aali Judge 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement