News
Typography

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य गुन्ह्यांच्या घटना आपण दररोज ऐकत असतो, पहात असतो. या घटना नकळतपणे आपल्याही मनात भीतीचं वातावरण निर्माण करतात. इतरांच्या बाबतीत घडणारे हे गुन्हे आपल्याही बाबतीत घडले तर? या विचाराने आपलं मन अस्थिर व्हायला लागतं. पण यापुढे असं होणार नाही. कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. कारण या गुन्हेगारी प्रवृत्तीचा खात्मा करण्यासाठी येतेय ‘स्पेशल ५’ ची टीम. आपल्या आजूबाजूला भीतीदायक वातावरण असताना ‘स्पेशल ५’ची ही टीम तुमच्यासाठी आशेचा किरण नक्कीच ठरेल.

Special 5 Inamdar 01

सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर पाच रांगड्या व्यक्तिमत्त्वांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. ‘स्पेशल ५’ या मालिकेत अजय पुरकर इन्सपेक्टर यशवंत इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत तर गौरी किरण दिसेल सब इन्सपेक्टर विद्या शिंदेच्या भूमिकेत आणि सब इन्सपेक्टर अर्जुन भोसलेच्या भूमिकेत दिसेल अभिनेता समीर विजयन. या तीनही कलाकारांच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे या टीममधले उर्वरित दोघं कोण असतील याची उत्सुकता आहे.

तेव्हा ‘स्पेशल ५’ टीमची जिगरबाज गोष्ट अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. १० डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Special 5 Arjun Bhosle 01

Special 5 New Marathi Crime Serial 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement